Weak Immunity : तुमची इम्युनिटी कमकुवत असल्यास शरीर देते हे 5 संकेत, चुकूनही इग्नोर करू नका

जेव्हा जेव्हा एखादा जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यावर हल्ला करून त्या विषाणूस संपवते
Weak Immunity
Weak Immunityesakal
Updated on

Weak Immunity : निसर्गात लाखो करोडो सूक्ष्म जंतू आहेत, जे हवा, पाणी आणि जेवणावाटे शरीरात प्रवेश करतात. एखादा आजार झाल्यास व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते. रोगप्रतिकारक प्रणाली WBC, लिम्फ नोड्स, प्लीहा, टॉन्सिल्स, अस्थिमज्जा, पेशी, ऊती आणि शरीरात तयार होणारी काही रसायने यांनी बनलेली असते. जेव्हा जेव्हा एखादा जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यावर हल्ला करून त्या विषाणूस संपवते. मात्र हीच कमकुवत झाली तर जगणे कठीण होऊन बसते. तेव्हा विक इम्युनिटीची लक्षणं वेळीच ओळखा.

इम्युनिटी कमकुवत झाल्यास दिसतात ही लक्षणं

काही कारणास्तव आपली ही रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागली, तर खोकला-सर्दी, ताप, डोकेदुखी, शरीरात कमजोरी, उलट्या यांसारख्या समस्या सातत्याने उद्भवू लागतात. जेव्हा असे घडते तेव्हा आपल्याला आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी बदलून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करावी लागेल. जेव्हा जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते तेव्हा ती आपल्याला अनेक मार्गांनी सिग्नल देऊ लागते. ही लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.

शरीराकडून मिळतात हे संकेत

पोट खराब होणे

जर तुमचे पोट वारंवार खराब होत असेल किंवा तुमची पचनशक्ती बिघडली असेल तर ते तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाल्याचे लक्षण आहे. तेव्हा तुम्ही वेळीच सावध व्हावे.

जखम लवकर बरी न होणे

जर तुमचे फुंसी फोड लवकर बरे होत नसतील किंवा ते बरे होण्यास बराच वेळ लागत असेल, तर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होत असल्याचे हे लक्षण आहे.

सतत तणावात राहाणे

तुम्हाला प्रत्येक वेळी तणाव जाणवत असेल किंवा अगदी थोडीशी प्रतिकूल गोष्ट ऐकूनही तुम्ही घाबरत असाल तर ते तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत निष्काळजीपणा करू नये.

Weak Immunity
Immunity : तुमच्या या साध्या-साध्या सवयीसुद्धा ठरतील आरोग्यासाठी घातक

वारंवार सर्दी

वारंवार सर्दी, खोकला किंवा ताप येणे हे देखील कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण आहे. यासोबतच कान दुखणे किंवा कानातून स्त्राव होणे हे देखील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचे लक्षण आहे. (Health)

Weak Immunity
Immunity Boost Tips : कोरोनाच्या BF.7 व्हेरिएंटचा वाढता धोका; अशी वाढवा इम्युनिटी

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे उपाय करा

जेव्हा तुम्हाला स्पष्टपणे प्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची लक्षणे दिसू लागतात, तेव्हा ही चिंतेची बाब बनते. अशा परिस्थितीत, त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, आपण आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी दररोज ७-८ तास पुरेशी झोप घेणे, सकस आहार घेणे, दररोज योगासने व चालणे, ध्यान-प्राणायाम आणि स्वच्छता सुधारणे यावर भर दिला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.