टेलबोनच्या दुखण्यावरील उपचार

सौम्य स्वरूपाचे दुखणे असल्यास त्यावर खालीलप्रमाणे घरगुती उपचार करू शकतात.
Tailbone Pain Treatment home remedy human body health
Tailbone Pain Treatment home remedy human body health Sakal
Updated on

- डॉ. अजय कोठारी | डॉ. सिंपल कोठारी

आपण गेल्या भागात टेल बोनच्या दुखण्याची माहिती घेतली. या भागात उपचार पद्धती जाणून घेणार आहोत. कारण व तीव्रतेवर उपचार अवलंबून असतात. सौम्य स्वरूपाचे दुखणे असल्यास त्यावर खालीलप्रमाणे घरगुती उपचार करू शकतात.

१) डोनट उशी किंवा वेज आकाराच्या जेल कुशन बसवून टेलबोनचा दाब काढू शकता.

२) वेदना कमी व स्नायू मोकळे करण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करा.

३) गरम व थंड पॅक आळीपाळीने लावून खालील बाजूस शेक घ्यावा.

४) मलमूत्र करताना वेदना होत असल्यास मल पातळ होण्याचे औषध घ्यावे.

५) वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे घेऊ शकता.

वरील उपचारांचा फारसा फरक जाणवत नसल्यास डॉक्टर तुम्हाला खालील पर्याय सूचवू शकतात.

१) नर्व्ह ब्लॉकचे इंजेक्शन ः वेदना व जळजळ कमी करण्यासाठी औषधे व स्टेराईडचे इंजेक्शन नसांमध्ये खालील भागात दिले जाते.

२) मसाज थेरपी ः

३) स्नायूंना ताणून शिरा मोकळ्या करणारी थेरपी.

४) अॅक्युपंक्चर ः विशिष्ट केंद्रावर पातळ सुया टोचल्या जातात व आपली नैसर्गिक ऊर्जा संतुलित केली जाते किमान पाच वेळा उपचार घेतल्यानंतर त्याचा फायदा जाणवतो. दीर्घकाळ वेदना असणाऱ्यांना हा उपाय प्रभावी ठरू शकेल.

५) टेन्स ः कमी व्होल्टेज विद्युत प्रवाहांच्या वापर केला जातो. त्यामुळे तुम्हाला वेदना कमी जाणवतात किंवा त्याची समज बदलते. दीर्घकालीन, तीव्र स्वरूपाच्या वेदना कमी करण्यासाठी टेन्स वापरले जाते.

६) कॉक्सिजिअल मॅनिप्युलेशन ः यामध्ये सरकलेले टेल बोन जागेवर आणता येते.

७) कोकिजेक्ट्रॉमी ः वरील उपचारापासून आराम मिळत नसल्यास हे उपचार करू शकतो. यामध्ये वेदना होत असलेल्या हाडाचा भाग काढला जातो.

रुग्णांना पडत असलेले प्रश्न

१) माझ्या टेल बोनला वेदना कशामुळे झाली?

२) माझ्या वेदना दूर व्हायला किती वेळ लागेल?

३) मी कोणती वेदनाशामक औषधे घ्यावीत?

४) डोनट कुशन कोणत्या प्रकारची वापरावीत?

५) मला शस्त्रक्रियेची गरज आहे का?

६) वेदना कमी करण्यासाठी मी आणखी काय करू शकते?

दुखण्यासोबत ताप असल्यास आणि महिन्याभरापेक्षा जास्त दिवस दुखत असल्यास, दुसऱ्या खालच्या हाडांमध्ये दुखत असल्यास, तुमच्या दैनंदिन कामात व्यत्यय येत असल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा व तपासण्या करून घ्याव्यात.

प्रतिबंधक उपाय...

  • जास्त वेळ बसणे टाळा, विशेषतः कठीण पृष्ठभागावर

  • सायकल चालवताना, खेळताना सावधगिरी बाळगा.

  • खाली पडण्याचा धोका कमी करण्यासाठी जिना प्रकाशमान ठेवा, शक्य असल्यास पायऱ्या उतरताना रेलिंगचा आधार घ्यावा.

  • चालताना फोन पाहणे टाळा.

  • बाथरूम धुतल्यानंतर कोरडे करा. जेणे करून पाय घसरून पडणार नाही.

  • रुग्णांनी धीर ठेवावा. ९० टक्के दुखणे काही दिवसात बरे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.