Test During Pregnancy : गरोदरपणात पहिल्या ३ महिन्यांमध्ये महिलांनी कोणत्या चाचण्या करणे आवश्यक? घ्या जाणून

Test During Pregnancy : जेव्हा एखाद्या महिलेला गर्भधारणा झाल्याचे कळते, तेव्हा सुरूवातीचे ३ महिने महिलेने स्वत:ची आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
Test During Pregnancy
Test During Pregnancy esakal
Updated on

Test During Pregnancy : महिलांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि सुखाचा क्षण म्हणजे आई होणे होय. जेव्हा एखाद्या महिलेला गर्भधारणा झाल्याचे कळते, तेव्हा सुरूवातीचे ३ महिने महिलेने स्वत:ची आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी नियमित तपासणी करणे आणि आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे.

गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये डॉक्टर काही चाचण्या करून घेण्यास सांगतात. जेणेकरून आईला होणारा कोणताही आजार बाळाला होऊ नये. तसेच, आई आणि बाळ या दोघांच्याही आरोग्यावर योग्य लक्ष ठेवता येईल, यासाठी त्या चाचण्या महत्वाच्या असतात. या चाचण्यांद्वारे हे देखील कळू शकते की, पोटात वाढणारे मूल हे निरोगी आहे की नाही. गरोदरपणाच्या पहिल्या ३ महिन्यांमध्ये कोणत्या चाचण्या कराव्यात? ते जाणून घेऊयात.

Test During Pregnancy
Deepika Padukone : दीपिका पादुकोण गरोदरपणात करतेय विपरित करणी योगासन, कसे करायचे हे आसन? जाणून घ्या फायदे

गर्भधारणा चाचणी

गर्भधारणा चाचणी ही सर्वात आधी केली जाते. कारण ही, चाचणी केल्याने महिला गर्भवती आहे की नाही त्याची पृष्टी होते. ही चाचणी लघवी किंवा रक्ताच्या नमुन्यांच्या आधारे केली जाते. एचसीजी हार्मोन्सचे प्रमाण लघवी चाचणीत तपासले जाते.

कारण, गर्भधारणेदरम्यान हा हार्मोन वाढतो. रक्ताच्या तपासणीमध्ये एचसीजी संप्रेरकाचे प्रमाण देखील दिसून येते. प्रेंग्नेंन्सी किटच्या आधारे देखील ही चाचणी करता येते. परंतु, डॉक्टरांनी गर्भधारणेची पृष्टी केल्यानंतरच पुढील चाचण्या  केल्या जातात.

लघवी तपासणी

गरोदरपणात लघवीची तपासणी करणे देखील महत्वाचे आहे. लघवीची तपासणी केल्याने, मूत्रसंसर्ग, मूत्रपिंडाचे कार्य,प्रथिनांचे प्रमाण यांची पृष्टी होते. तसेच, लघवीच्या चाचणीतून रक्तातील साखरेची पातळी तपासली जाते, जी मधुमेहींसाठी महत्वाची असते.

रक्त तपासणी

गरोदरपणात विविध प्रकारच्या रक्त तपासण्या केल्या जातात. यामध्ये हिमोग्लोबीन, संपूर्ण रक्ताची गणना, रक्तगट, आरएच फॅक्टर इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे. एचआयव्ही आणि हिपॅटायटीस बी साठी देखील रक्त तपासणी केली जाते. जेणेकरून आईला कोणतीही समस्या नाही ना? याची खात्री करता येते. या चाचण्या बाळ आणि आई दोघांसाठी केल्या जातात. रक्त तपासणीद्वारे योग्यवेळी समस्यांवर उपचार करता येतात.

अल्ट्रासाऊंड चाचणी

गर्भधारणेच्या सुरूवातीच्या काळात २-३ अल्ट्रासाऊंड चाचण्या केल्या जातात. गर्भधारणा झाल्यानंतर, सुरूवातीला 4-6 आठवड्यानंतर पहिली अल्ट्रासाऊंड चाचणी केली जाते. त्यानंतर, पुढील १२-१४ आठवड्यात दुसरी अल्ट्रासाऊंड चाचणी केली जाते.

या चाचणीद्वारे गर्भाचा विकास आणि गर्भाशयाची स्थिती तपासली जाते. त्यानंतर १८-२२ आठवड्यात तिसरी अल्ट्रासाऊंड चाचणी केली जाते. ज्यामध्ये तपशीलमध्ये तपासणी केली जाते. या प्रकारे गर्भधारणेच्या पहिल्या ३ महिन्यांमध्ये २-३ अल्ट्रासाऊंड चाचण्या केल्या जातात.

Test During Pregnancy
Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणामुळे त्रस्त आहात? मग, 'या' योगासनांचा दररोज करा सराव, जाणून घ्या पद्धत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.