‘शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम्’ अर्थात शरीर हेच मनुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन-धन. मनुष्य म्हटला की आपल्या डोळ्यासमोर त्याचे शरीर उभे राहते. एखादे गृहस्थ कुठे आहेत असे म्हटले की आपण त्यांच्या घराकडे बोट दाखवतो, पण घर म्हणजे तो मनुष्य नसतो. तसे शरीराच्या आत असणारा जीव, जो स्वतःचे उद्दिष्ट साध्य करून जगाच्या संपूर्ण रचनेत व एकूण येथे नांदणाऱ्या उल्हास व आनंदाचा अनुभव घेऊन परत आपल्या स्थानात विलीन होणे या हेतूने आलेला असतो; आणि त्यासाठी शरीर आवश्यक असते.