- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग
दर सप्टेंबर महिन्यात, पोषणविषयक जागरूकता, विशेषतः लहान मुले व स्त्रियांसाठी पोषणांचे महत्त्व समजण्यासाठी, भारतात ‘राष्ट्रीय पोषण मास’ पाळला जातो. नुकत्याच झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा विशेष उल्लेख करून कुपोषण दूर करून आरोग्यदायी जीवनासाठी प्रेरणा देणाऱ्या सरकारी विविध प्रयत्नांवर भर दिला.
यावर्षी, आवश्यक जीवनसत्त्वे व क्षार आणि स्थूलत्व यामुळे होणाऱ्या अपुरा आहार, लपलेली भूक यांसारख्या कुपोषणांना हाताळण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. सार्वजनिक आरोग्य शिक्षण आणि सामाजिक पोषण क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या आहारतज्ज्ञासाठी हे विषय हृदयाच्या जवळचे आहेत.