बहुतांश महिला पाळीच्या काळामध्ये सॅनिटरी नॅपकिन्सला अधिक पसंती देताना दिसतात. पाळी म्हणजे सॅनिटरी नॅपकिन असं एक समीकरणच महिलांच्या जगात निर्माण झालं आहे. सरकारनं महिलांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून द्यायची घोषणा केली आहे.
इतकंच काय तर काही दिवांपूर्वी #PadManChallenge घेत बॉलीवुडच्या अनेक सेलिब्रिटींसह सर्व सामान्य स्त्री-पुरुष, विशेषतः पुरुष, हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरले झाले होते. पाळीत वापरलेल्या पॅडचा पर्यावरणावर, कचरा वेचकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिनला अनेक पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत.
आपण सॅनिटरी नॅपकिन्स वापरतो, त्यात प्लॅस्टिक असतं. पण ते नष्ट खुप कालावधी लागतो. वापरलेल्या पॅडमध्ये अशुद्ध रक्त असतं. कचरा वेचणारे लोक त्यांना हाताने वेगळं करतात आणि त्यामुळे त्यातून जंतुसंसर्ग किंवा त्वचेचे इतर रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे अनेक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याऐवजी इतर इको-फ्रेंडली पर्याय वापरण्यासाठी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे महिलांनो जाणून घ्या सॅनिटरी नॅपकिनला कोणते पर्याय आहेत?
मेन्स्ट्रुअल कप
मेन्स्ट्रुअल कप हे एक मेडिकल ग्रेड सिलिकॉनपासून बनलेले वैद्यकीय साधन आहे. हे लवचिक असल्यामुळे योनीमार्गात सोप्या पद्धतीने घालता येते. १२ तासांपर्यंत लिक फ्री प्रोटेक्शन असते. मेंस्ट्रुअल कप सोबत धावणे, प्रवास करू शकता, पोहू शकता, योगा, जिम करू शकता.
एक मेन्स्ट्रुअल कप सहजपणे ५ ते ६ वर्ष वापरता येतो म्हणून हे पर्यावरणासाठी उपयुक्त ठरते. मेन्स्ट्रुअल कप पुन्हा वापरण्यास योग्य असून त्याचा कचरा निर्माण होत नाही.
टॅम्पॉन
पाश्चात्य देशांमध्ये प्रचलित असलेला हा प्रकार भारतात फारसा वारपला जात नाही. सॅनिटरी नॅपकिन्ससारखाच काहीसा हा प्रकार. पण पॅडस योनीच्या बाहेर राहून पाळीचा रक्तस्राव शोषतात तर टॅम्पॉन योनीच्या आत घालावे लागतात. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याची शोषणक्षमता सर्वाधिक असते. काही टॅम्पॉन तर रात्रभर वापरले तरी चालतात.
पिरीयड पॅंटी
पॅँटीच्या आत पाळीचा रक्तस्राव शोषण्यासाठी पॅड, टॅम्पून किंवा कप वापरण्यापेक्षा पॅन्टीच रक्तस्राव शोषणारी असेल तर? अमेरिकेतल्या काही कंपन्यांनी अशा पँटी बाजारात आणल्या आहेत. त्यांची शोषक्षमता टॅम्पॉन एवढीच, किंबहुना जास्त आहे असा त्यांचा दावा आहे. पाळी दरम्यान फक्त ही पँटी घालायची आणि दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज पडणार नाही या कंपन्यांचं म्हणणं आहे. काही भारतीय कंपन्यांनीही अशा प्रकारच्या अंडरवेअरचं उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.