Health Care : निरोगी हृदयासाठी लाभदायी आहे काळे मीठ, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

भारतीय स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये विविध प्रकारचे मसाले आणि काळ्या मीठाचा समावेश आढळून येतो. हे काळे मीठ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
Health Care
Health Careesakal
Updated on

Health Care : भारतीय स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये विविध प्रकारचे मसाले आणि काळ्या मीठाचा समावेश आढळून येतो. हे काळे मीठ सहजपणे उपलब्ध होते. हे काळे मीठ खाद्यपदार्थांची, कोशिंबीरची चव तर वाढवतेच या सोबतच आपल्या आरोग्यासाठी हे काळे मीठ फायदेशीर ठरते.

पचनक्रिया सुधारण्यासाठी काळे मीठ मदत करते. काळ्या मीठामध्ये पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते. आज आपण काळ्या मीठाचे आरोग्याला होणारे विविध प्रकारचे फायदे जाणून घेणार आहोत.

Health Care
Health Care : दिवसाची सुरुवात चहा-कॉफीने करण्याऐवजी कोमट पाण्याने करा, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

काळ्या मीठामध्ये आढळून येणारे पोषकघटक आपल्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचे काम करते. यामुळे, आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते. त्यामुळे, ज्या लोकांना खराब कॉलेस्ट्रॉलची समस्या आहे, अशा लोकांनी काळ्या मीठाचे जरूर सेवन करावे.

यामुळे, त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. मात्र, काळ्या मीठाचा प्रमाणापेक्षा अधिक वापर करणे टाळा. प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात या मीठाचा वापर करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

काळ्या मीठामध्ये अँटिओबेसिटी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे, जर तुम्ही विविध फळांचे ज्यूस, सॅलेड आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये काळ्या मीठाचा वापर केल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकेल.

यासोबतच आपले शरीर डिटॉक्स करण्यासाठी काळे मीठ अतिशय फायदेशीर आहे. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात हे चिमूटभर मीठ मिसळून याचे सेवन करू शकता.

पचनक्रिया सुधारते

सध्याची बिघडलेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. फास्टफूडच्या सेवनामुळे आणि खाण्याच्या अस्वस्थ सवयींमुळे अनेक जण पोटाच्या तक्रारी करतात.

यामध्ये पचनाच्या समस्येचा सर्वाधिक समावेश आहे. जर तुम्हाला ही पोटदुखीचा किंवा पोटाच्या कोणत्याही समस्येचा त्रास संभवत असेल तर तुम्ही आहारात काळ्या मीठाचा जरूर समावेश करावा. नियमितपणे कोमट पाण्यात चिमूटभर काळे मीठ घेतल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. शिवाय, तुमची पचनक्रिया सुधारेल.

Health Care
Health Care : टायफॉईडमधून बरे झाल्यानंतर अशक्तपणा जाणवतोय? मग, अशा प्रकारे घ्या काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.