Health Care : खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ फळाचे करा सेवन, मिळतील अनेक फायदे

हिवाळ्यात आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते.
Health Care
Health Careesakal
Updated on

Health Care : हिवाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळे मार्केटमध्ये येतात. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची देखील खास काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये संत्रा, पेरू, सफरचंद इत्यादी फळे मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये विक्रीला येतात.

त्यामुळे, हिवाळ्यात या फळांचे आवर्जून सेवन केले जाते. थंडीमध्ये पेरू खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. पेरूमध्ये व्हिटॅमीन सी आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, पेरूचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि इतर समस्यांचा धोका कमी होतो.

विशेष म्हणजे पेरूचे सेवन केल्याने खोकला कमी होण्यास देखील मदत होते. त्यामुळे, या दिवसांमध्ये पेरूचे आवर्जून सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Health Care
Health Care : हिवाळ्यात अंगदुखी जाणवतेय? मग, जाणून घ्या त्यामागची 'ही' कारणे

पेरूचे आरोग्याला होणारे फायदे खालीलप्रमाणे

सर्दी-खोकल्यासाठी फायदेशीर

हिवाळ्यात वातावरणातील बदलांमुळे अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आहारात पेरूचा जरूर समावेश करू शकता. तसेच, खोकला दूर करण्यासाठी तुम्ही पेरू शिजवून घ्या आणि त्याचा स्मॅश करा. आता या स्मॅशमध्ये काळे मीठ मिक्स करा आणि याचे सेवन करा. यामुळे, तुमचा खोकला राहण्यास मदत होईल. (Beneficial for cold and cough)

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात 'व्हिटॅमीन अ' चे भरपूर प्रमाण आढळून येते. या व्हिटॅमीनमुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. व्हिटॅमीन अ सोबतच पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात 'व्हिटॅमीन क' चे विपुल प्रमाण आढळून येते. 'व्हिटॅमीन क' मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि शरीराला पुरेशा प्रमाणात ताकद मिळते (The immune system increases)

पोटाच्या समस्या दूर होतात

पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये फायबर्सचा ही समावेश आढळून येतो. या फायबर्समुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळतेच शिवाय, पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. (Elimination of stomach issues)

पोट जड होणे, पोटात दुखणे किंवा पोटात गॅस होणे इत्यादी समस्या दूर करण्यासाठी पेरूचे अवश्य सेवन करा. यामुळे, तुम्हाला आराम मिळेल. (health benefits of guava)

Health Care
Health Care : हिवाळ्यात संत्रा खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या ‘हे’ फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.