Pineapple Health Benefits : दिसायला काटेरी पण करेल पचनाच्या समस्या दूर ! जाणून घ्या अननसाचे आरोग्यदायी फायदे

निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे, फायदेशीर आहे. संतुलित आहारामध्ये अनेक खाद्यपदार्थांचा समावेश असतो. या खाद्यपदार्थांमध्ये ताज्या फळांचा ही समावेश आहे.
Health Care
Health Care esakal
Updated on

Health Care : निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे, फायदेशीर आहे. संतुलित आहारामध्ये अनेक खाद्यपदार्थांचा समावेश असतो. या खाद्यपदार्थांमध्ये ताज्या फळांचा ही समावेश आहे. या ताज्या फळांमध्ये अनेक प्रकारची फळे समविष्ट आहेत. या फळांमध्ये अननस या उष्णकटिबंधीय फळाचा समावेश आहे.

अननस हे फळ बाहेरून दिसायला काटेरी दिसते. मात्र, चवीला हे फळ आतून गोड-आंबट लागते. त्यामुळे, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हे फळ खायला आवडते. या फळापासून ज्यूस देखील केला जातो. उन्हाळ्यात खास करून या फळाला विशेष मागणी असते.

अननसामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमीन बी-६, मॅंगनीज, कॉपर, फॉलेट आणि विविध प्रकारचे फायबर्स आढळून येतात. या पोषकघटकांमुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आपण अननसाचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

Health Care
Health Care : दिवसाची सुरूवात करा कोरफड ज्यूसने, तुम्हाला मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

अननसामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. हे व्हिटॅमीन सी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. ज्यामुळे, विविध प्रकारच्या संसर्गांशी लढण्यासाठी आपल्या शरीराला पुरेशी ताकद मिळते. यामुळे शरीर निरोगी देखील राहते. त्यामुळे, तुमच्या आहारात अननसाचा जरूर समावेश करा.

पचनक्षमता सुरळीत राहते

अननसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्सचा समावेश आढळून येतो. हे फायबर्स शरीरातील पचनक्षमता सुरळीत ठेवण्याचे काम करतात. या फायबर्समुळे अन्नाचे पचन योग्यरित्या होण्यास मदत होते. यासोबतच अननसाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या जसे की, गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते. ज्या लोकांना पोटाच्या किंवा पचनाच्या समस्या आहेत, अशा लोकांनी त्यांच्या आहारात अननसाचा जरूर समावेश करावा.

हृदयासाठी फायदेशीर

अननसामध्ये भरपूर प्रमाणात आढळून येणारे फायबर्स आणि व्हिटॅमिन सी आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. अननसाचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. यासोबतच उच्च रक्तदाब यांसारखी समस्या दूर होऊ शकते. हृदयासाठी फायदेशीर असणाऱ्या अननसाचा तुमच्या आहारात जरूर समावेश करा.

त्वचेसाठी लाभदायी

अननसामध्ये आढळून येणारे व्हिटॅमीन सी आणि इतर पोषकघटक त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. त्यामुळे, त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी जसे की, काळे डाग, पिंपल्सच्या समस्या दूर करण्यासाठी अननस उपयुक्त आहे. अननसाचे सेवन केल्याने त्वचेवर चमक येण्यास मदत होते.

Health Care
Health Care : हिवाळ्यात खायलाच हवा हरभरा, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.