Rice Water Benefits : रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते उर्जा वाढवण्यापर्यंत, तांदळाचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

Rice Water Benefits : आपल्या भारतीय स्वयंपाकघरात नेहमीच शिजवला जाणारा गरमागरम भात हा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.
Rice Water Benefits
Rice Water Benefitsesakal
Updated on

Rice Water Benefits : आपल्या भारतीय स्वयंपाकघरात नेहमीच शिजवला जाणारा गरमागरम भात हा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का की, शिजवलेल्या भाताचे पाणी देखील तितकेच हेल्दी आहे. या शिजवलेल्या तांदळाचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होतात.

तांदूळ शिजवून झाल्यानंतर जेव्हा भात काढून घेतला जातो, तेव्हा त्यामधील पाणी फेकून न देता ते पिण्यासाठी वापरावे. हे पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. कारण, या पाण्यात कार्बोहायड्रेट्सचे विपुल प्रमाण आढळून येते. या तांदळाच्या पाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे कोणते? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

Rice Water Benefits
Magnesium rich foods : तुमच्या शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता आहे? मग, आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

शरीर हायड्रेटेड ठेवते

सध्या देशातील काही भागांमध्ये थंडी जाणवत असली तरी देखील काही भागांमध्ये तापमान आतापासूनच वाढले आहे. जणू काही उन्हाळ्याला सुरूवात झाल्यासारखे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे, या दिवसांमध्ये शरीराचे डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याची मदत घेऊ शकता.

शरीराचे होणारे डिहायड्रेशन रोखण्यासाठी तुम्ही तांदळाचे पाणी पिऊ शकता. हे पाणी प्यायल्यामुळे शरीराचे योग्य संतुलन राखले जाते, आणि शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढली जाते. (keep the body hydrated)

रक्तदाब नियंत्रित करते

अनेक उपाय करूनही जर तुमचा रक्तदाब नियंत्रणात येत नसेल तर, तुम्ही तांदळाचे पाणी पिणे फायद्याचे ठरू शकते. या तांदळाच्या पाण्यामध्ये सोडिअमचे प्रमाण ही कमी असते, त्यामुळे, हे पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.

ज्य लोकांना रक्तदाबाची समस्या असेल त्या लोकांनी या तांदळाच्या पाण्याचे जरूर सेवन करावे. हे सेवन मर्यादित प्रमाणात करायला विसरू नका. एकदा हवे तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला यासाठी घेऊ शकता. (control blood pressure)

शरीराला मिळते ऊर्जा

कर्बोदकांनी समृद्ध असलेले हे तांदळाचे पाणी प्यायल्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे, तुम्हाला लगेच फार भूक लागत नाही. हे पाणी प्यायल्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा तर मिळतेच आणि वजन कमी करण्यातही मदत होते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्या लोकांनी या तांदळाच्या पाण्याचे जरूर सेवन करावे. नियमितपणे हे पाणी प्यायल्यामुळे, तुमचे वजन घटू शकते. (body gets energy)

Rice Water Benefits
Tea For Headache : डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग, प्या 'हे' खास प्रकारचे चहा, मिळेल आराम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.