Olive Oil Benefits : मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे ऑलिव्ह ऑईल, जाणून घ्या ‘हे’ फायदे

आजकाल निरोगी राहण्यासाठी स्वयंपाकघरात ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जातो. ऑलिव्ह ऑईलचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणते आहेत ते फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.
Olive Oil Benefits
Olive Oil Benefits esakal
Updated on

Olive Oil Benefits : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. मात्र, हे सर्वांसाठी आजकाल मोठे आव्हान झाले आहे. एकूणच आरोग्य चांगले रहावे म्हणून काय करता येईल? याचा लोक विचार करतात.

त्यासाठी मग, अनेक प्रयत्न केले जातात. जसे की, जिम, योगा, व्यायाम, मेडिटेशन आणि आयुर्वेदाची देखील मदत घेतली जाते. आजकाल निरोगी राहण्यासाठी स्वयंपाकघरात ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जातो. ऑलिव्ह ऑईलचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणते आहेत ते फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

Olive Oil Benefits
Health Care : कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली आहे हे कसे ओळखाल? जाणून घ्या ‘ही’ प्रमुख लक्षणे

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

सर्व शारिरीक समस्यांचे किंवा आजारांचे मूळ हे तणावात आहे. जर तुम्ही जास्त स्ट्रेस घेतला तर त्याचा आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे, या परिस्थितीमध्ये ऑलिव्ह ऑईल उपयुक्त ठरते.

ऑलिव्ह ऑईल तुम्हाला नैराश्यापासून दूर ठेवते. तसेच, आपल्या शरीरातील सेरोटोनिन या हार्मोनची पातळी वाढवण्याचे काम ऑलिव्ह ऑईल करते. यामुळे, आपले मन प्रसन्न आणि आनंदी राहण्यास मदत होते. या तेलामुळे शरीरातील वात देखील कमी होतो. ऑलिव्ह ऑईलमध्ये तणाव कमी करण्याची देखील क्षमता आहे, ज्यामुळे, मानसिक आरोग्य चांगले राहते.

पोटाच्या समस्या दूर करते

खाद्यपदार्थ बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पोट जड होणे, पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठता इत्यादी पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर आहे. या तेलामुळे आपली पचनक्षमता सुधारण्यास मदत होते आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते.

हृदयाला ठेवते निरोगी

ज्या लोकांना मधुमेह आहे आणि हृदयाशी निगडीत समस्या आहेत, अशा लोकांसाठी ऑलिव्ह ऑईल हे अतिशय रामबाण आहे. हृदयाशी निगडीत समस्यांचा आणि मधुमेहाचा जवळचा संबंध असल्याचे अनेक संशोधनांमधून समोर आले आहे.

त्यामुळे, ज्या लोकांना मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत समस्या आहेत, अशा लोकांनी ऑलिव्ह ऑईलचा नक्की वापर करावा. यामुळे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.

Olive Oil Benefits
Health Care : खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ फळाचे करा सेवन, मिळतील अनेक फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.