Health Care : जगभरातील लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण म्हणजे कॅन्सर होय. कॅन्सर या आजाराला जगभरातील असंख्य लोक बळी पडतात. दरवर्षी अनेक जण कॅन्सरवर (कर्करोग) उपचार घेतात. ४ फेब्रुवारीला जगभरात 'जागतिक कर्करोग दिन' साजरा केला जातो.
जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की, कर्करोगासारख्या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि विविध प्रकारच्या कॅन्सरची लक्षणे ओळखण्यासाठी माहिती देणे.
कर्करोग हा आजार टाळण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही. वैद्यकीय शास्त्राने याबाबत बरेच संशोधन केले असले तरी, देखील यावरील ठोस उपचार अद्याप उपलब्ध नाहीत. कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत.
काही आपल्या चुकीच्या सवयी देखील आहेत, ज्यामुळे कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. आज आम्ही तुम्हाला कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी काही निरोगी सवयींबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा अवलंब केल्याने तुम्ही निरोगी रहाल आणि कॅन्सरपासून दूर राहू शकाल.
पोटाचा आणि स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. तुम्ही विविध प्रकारचे व्यायाम करू शकता किंवा दररोज किमान ३० मिनिटे चालण्याचा व्यायाम करू शकता. यामध्ये वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. सायकल चालवणे किंवा पोहण्याचा ही व्यायाम तुम्ही करू शकता.
संशोधनानुसार, जर तुम्ही नियमितपणे शारिरीक व्यायाम केला तर तुमचे आरोग्य ही चांगले राहते आणि कर्करोगाचा धोका ही कमी होतो. त्यामुळे, संतुलित आहारासोबतच नियमित व्यायाम करायला विसरू नका.
कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी तुम्ही संतुलित आहार घेणे, आवश्यक आहे. निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि व्यायाम यांचा योग्य समतोल राखणे, महत्वाचे ठरते.
तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, पौष्टिक अन्न, मांस आणि प्रथिनांनी युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करा. प्रथिने, फळे आणि भाज्यांमध्ये आढळणारी अनेक जीवनसत्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करतात.
जगभरात कर्करोगाने मृत्यू होणाऱ्यांपैकी निम्मे मृत्यू हे तंबाखूच्या सेवनामुळे होतात. जे अनावश्यक मृत्यूचे सर्वात मोठे जागतिक कारण बनले आहे. कर्करोगापासून दूर रहायचे असेल तर तंबाखूसोबतच दारूचे सेवन करणे देखील टाळणे गरजेचे आहे.
दारूचे सेवन केल्याने स्तन आणि किडनीचा कर्करोग होण्याचा धोका संभवतो. यासोबतच विविध आजारांचा देखील धोका राहतो. त्यामुळे, कर्करोग आणि इतर आजारांचा धोका टाळण्यासाठी दारूचे सेवन करू नका आणि धूम्रपान करू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.