Feeling Extreme Cold In Winter: हिवाळा सुरु होऊन आता एक महिना झाला आहे. सर्वत्र थंडी हळूहळू वाढू लागली आहे. आणि या थंडीसोबतच वाढू लागले आहेत ते आजार. त्यामुळे आपल्या आरोग्याची खास काळजी घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. हिवाळ्यात हात - पाय आणि नाक गार पडणे, सर्दी- खोकला किंवा घशाची खवखव हे सामान्य आहे. परंतु बऱ्याच जणांना इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते. तुम्हालाही असे होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.