Liver Health : निरोगी यकृतासाठी 'या' डिटॉक्स ड्रिंक्सचा करा आहारात समावेश, मिळतील भरपूर फायदे

Liver Health : धूम्रपान, मद्यपान आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने यकृतामधअये विषारी घटक जमा होतात.
Liver Health
Liver Health esakal
Updated on

Liver Health : पावसाळा सुरू झाला की, आपल्याला तळलेले चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेकदा मग स्ट्रीटफूडचा आस्वाद घेतला जातो. परंतु, हे स्ट्रीट फूड आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. अनेकदा हे तळलेले पदार्थ एकाच तेलामध्ये कित्येकदा तळले जातात. त्यामुळे, अशा पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या तेलकट पदार्थांमुळे यकृताच्या गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.

या व्यतिरिक्त धूम्रपान, मद्यपान आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने यकृतामधअये विषारी घटक जमा होतात. ज्यामुळे, फॅटी लिव्हर आणि यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये लिव्हर डिटॉक्स करणे अत्यंत आवश्यक आहे. यकृत आतून चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही रिकाम्या पोटी काही डिटॉक्स ड्रिंक्स पिऊ शकता. कोणती आहेत ही डिटॉक्स ड्रिंक्स? चला तर मग जाणून घेऊयात.

Liver Health
World Hepatitis Day 2024 : हिपॅटायटीसपासून बचाव करायचांय? मग, तुमच्या आहारात 'या' खाद्यपदार्थांचा करा समावेश

आवळा ज्यूस

आवळा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषकतत्वांचा खजिना मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे, आवळ्याचे सेवन करणे हे केवळ डोळ्यांसाठी, त्वचेसाठी, केसांसाठीच नाही तर यकृतासाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने यकृत डिटॉक्स होते आणि यकृताचे आरोग्य चांगले राहते.

मेथीचे पाणी

मेथीच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. हे अँटी-ऑक्सिडंट्स यकृतातील पेशींचे नुकसान कमी करतात. या शिवाय, मेथी दाण्यांमुळे पचनक्षमता सुधारते जे यकृताच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. त्यामुळे, रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा मेथी दाणे पाण्यात उकळून त्याचे पाणी प्या. हे पाणी प्यायल्यामुळे यकृत आतून चांगल्या प्रकारे स्वच्छ होते आणि यकृत निरोगी राहते.

कोरफड ज्यूस

कोरफड आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. परंतु, तुम्हाला माहित आहे का? कोरफडचा रस हा यकृताच्या आरोग्यासाठी देखील लाभदायी आहे. कोरफडमध्ये असलेले पोषकघटक यकृत स्वच्छ करण्यास मदत करतात.

तसेच, कोरफडमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म यकृताची जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे, सकाळी रिकाम्या पोटी कोरफडचा ज्यूस(रस) अवश्य प्या. यामुळे, यकृताचे डिटॉक्सिफिकेशन होईल आणि यकृत निरोगी राहील.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()