Thigh Exercise: मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

'हे' व्यायाम मांड्या मजबूत करण्यासही मदत करतात. यात नेमक्या कोणत्या व्यायामांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
Thigh Facts: Do these exercises for thigh
Thigh Facts: Do these exercises for thigh esakal
Updated on

शरीराची चरबी वाढली की अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाढलेले चरबी कमी करणेही कठीण होते. आणि त्यात मांड्यांची चरबी कमी करणे आणखीच कठीण आहे. पायाच्या चांगल्या आरोग्यासाठी मांडीच्या स्नायूंना आकार देणे, टोनिंग करणे आणि मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी काही व्यायाम खूप फायदेशीर ठरतात. त्यांच्या मदतीने चरबीवर नियंत्रण ठेवता येते. तसेच हे व्यायाम मांड्या मजबूत करण्यासही मदत करतात. यात नेमक्या कोणत्या व्यायामांचा समावेश आहे ते जाणून घेऊया. (How to loose thigh weight and do these exercises)

सायकलिंग- तणावातून मुक्त होण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. हा एक कार्डिओ व्यायाम आहे. हा व्यायाम केवळ मांड्या टोन करण्यासच नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारतो. सायकल चालवून वजन झपाट्याने कमी करता येते. सायकलिंगमुळे स्नायूही मजबूत होतात.

स्वीमिंग - स्वीमिंग चरबी कमी करण्यास मदत करू शकते. दररोज एक ताप पोहल्याने मांड्यांवर चांगले परिणाम दिसतात.

Thigh Facts: Do these exercises for thigh
Weight Loss Tips : सणांच्या दिवसात वाढलेलं वजन अशा प्रकारे कमी करा

पायऱ्या वापरा - आजकाल प्रत्येकजण लिफ्ट किंवा एक्सलेटरचा वापर करतो. अशा वेळी सगळेच जण ऑफिस किंवा मॉलमध्ये लिफ्ट किंवा इलेक्ट्ऱॉनिक पायऱ्या वापरत असाल तर त्याऐवजी पायऱ्या वापरा.

५ स्क्वॅट्स करा- पायांना आकार देण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. मांडीची चरबी कमी करण्यासाठी दररोज २०-३० मिनिटे स्क्वॅट्स करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.