Lungs Cough Relief : हिवाळ्यात छातीतील कफ दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय आहेत फायदेशीर

थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी-खोकला, घसा खवखवणे, कफ होणे, ताप येणे अशा समस्यांना सुरूवात होते.
Lungs Cough Relief
Lungs Cough Reliefesakal
Updated on

Lungs Cough Relief Tips : वातावरणात बदल झाला की, त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे, थंडीच्या दिवसांमध्ये तर सर्दी-खोकला, घसा खवखवणे, कफ होणे, ताप येणे इत्यादी अनेक समस्यांना सुरूवात होते.

या समस्यांना दूर करण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो. सर्दी-खोकल्याच्या समस्या एकवेळ लवकर दूर होऊ शकतात. मात्र, सर्दीमुळे तयार झालेला कफ लवकर जात नाही. हा कफ छातीत साचून राहतो आणि मग याचा आपल्याला त्रास होतो.

छातीत जमा झालेला हा कफ दूर करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. कोणते आहेत हे घरगुती उपाय ? चला तर मग जाणून घेऊयात.

छातीत जमा झालेला कफ दूर करण्यासाठी हे खालील घरगुती उपाय करा

मीठाच्या पाण्याने गुळण्या करा

हा उपाय करण्यासाठी एक ग्लास गरम पाणी घ्या. त्यामध्ये मीठ घाला. आता या मीठाच्या पाण्याने गुळण्या करा. या गुळण्या केल्यामुळे घशातील सूज, खवखव आणि कफच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच, या गुळण्या केल्यामुळे, छातीतील कफ बाहेर पडण्यास मदत होते. हा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे.

Lungs Cough Relief
Tulsi And Ginger Tea : हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी ‘हा’ हर्बल चहा आहे फायदेशीर

तुळस आणि आल्याचा चहा

तुळस ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती असून आलं देखील आपल्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. या दोन्ही घटकांमध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी इंन्फ्लेमेटरी, अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात.

त्यामुळे, सर्दी-खोकला, ताप, घसा खवखवणे, कफ होणे इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळस-आल्याचा चहा फायदेशीर आहे. तुम्ही तुळस-आल्याचा काढा देखील पिऊ शकता. छातीत साचलेला कफ बाहेर काढण्यासाठी तुळस-आल्याचा चहा मदत करतो.

गरम पाणी आणि पुदिना

पुदिना ही औषधी वनस्पती आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पुदिन्याचे तेल देखील कफची समस्या दूर करण्यासाठी मदत करते. गरम पाणी आणि पुदिन्याचा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका भांड्यात गरम पाणी घ्यावे लागेल.

या गरम पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे ३-४ थेंब टाका. आता याची वाफ घ्या. ही वाफ घेतल्याने छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी मदत होते. हा उपाय तुम्ही दिवसातून ३-४ वेळा करू शकता.

Lungs Cough Relief
Health Care : हिवाळ्यात डिंकाचे सेवन करणे आरोग्यासाठी आहे लाभदायी, जाणून घ्या 'हे' फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.