Home Remedies for Acidity : पोटातील उष्णता आणि अ‍ॅसिडिटीमुळे हैराण आहात? मग, ‘या’ घरगुती उपायांची घ्या मदत, मिळेल आराम

Home Remedies for Acidity : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मात्र, आजकालचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी, कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
Home Remedies for Acidity
Home Remedies for Acidityesakal
Updated on

Home Remedies for Acidity : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मात्र, आजकालचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी, कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

रात्री उशिरा जेवण करणे आणि जागरण करणे, इत्यादी गोष्टींमुळे पोटाच्या समस्यांना आमंत्रण मिळते. मग, पोटात जळजळ होणे, अपचन, पित्त, अ‍ॅसिडिटी आणि गॅस तयार होणे इत्यादी समस्या भेडसावू लागतात. छातीत किंवा पोटात जळजळ असो किंवा पोटात होणारी जळजळ असो, या सर्वांचा आपल्या मनावर आणि मेंदूवर परिणाम होतो.

या पोटाशी संबंधित समस्या खास करून उन्हाळ्यात अधिक प्रमाणात होतात. मात्र, याकडे दुर्लक्ष करू नका. या समस्यांवर वेळीच उपचार करा. अन्यथा गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता आणि या समस्यांपासून आराम मिळवू शकता.

Home Remedies for Acidity
Pineapple Health Benefits : दिसायला काटेरी पण करेल पचनाच्या समस्या दूर ! जाणून घ्या अननसाचे आरोग्यदायी फायदे

दही किंवा ताक

पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कॅल्शिअमयुक्त दही किंवा ताकाचे सेवन करू शकता. आपले अन्न पचवण्यासाठी दही किंवा ताक हे अतिशय उपयुक्त आहे. पोटातील जळजळ थांबवण्यासाठी तुम्ही ताक किंवा दह्याचे सेवन करू शकता.

यामुळे पोटाला आराम मिळतो आणि पोटाला थंडावा मिळण्यास मदत होते. हा एक रामबाण उपाय आहे. हा उपाय करताना एक काळजी अवश्य घ्या, ती म्हणजे ताक किंवा दही हे ताजे असावे आणि त्यात मीठ अजिबात मिसळू नका. (curd or Buttermilk)

काकडी

काकडी खायला आपल्या सर्वांनाच आवडते. या काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांसोबतच खनिजे, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि कॅल्शिअम यांचे विपुल प्रमाण काकडीमध्ये असते.

या व्यतिरिक्त काकडीमध्ये भरपूर पाणी आढळते. त्यामुळे, पोटातील जळजळ किंवा पोटाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काकडीची मदत घेऊ शकता. यामुळे, पोटाला थंडावा मिळतो आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. पोटाला थंडावा देण्यासोबतच पोट शांत ठेवण्याचे काम काकडी करते.

जेव्हा तुम्हाला पोटामध्ये जळजळ किंवा अ‍ॅसिडिटीसारखा त्रास संभवतो, तेव्हा काकडीचे सेवन अवश्य करा. आरोग्यासोबतच काकडी आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. (Cucumber)

Home Remedies for Acidity
Foods for Hemoglobin : शरीरात रक्ताची कमतरता जाणवतेय? मग, 'या' खाद्यपदार्थांच्या सेवनाने वाढवा हिमोग्लोबीनची पातळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.