- गायत्री सुधाकर तौर
हृदयाच्या महत्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होऊन हार्ट अटॅक येण्याचे संकेत असतात. काही दिवसांपासून बऱ्याच सेलिब्रिटींना एका मागे एक हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या आपण सर्वांनी वाचल्या असाव्यात.
युवा पिढीमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त आढळून आलेत. सगळ्यात भितीदायक बाब म्हणजे हार्ट अटॅकमुळे मृत्यू पावलेले अनेक तरुण पूर्णपणे निरोगी होते. आजकाल हार्ट अटॅक एक चिंतेचा विषय आहे.
विशेष म्हणजे हार्ट अटॅक टाळण्यासाठी, आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये काही अडथळा आहे की नाही, हे जाणून घेणे सर्वात महत्वाचं ठरतं. जर हृदयाच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असेल तर अडथळा निर्माण होऊन हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस अधिक वाढतात. (these reasons causes heart attack healthy lifestyle )
काय आहेत धोक्याचे संकेत?
थोड काम केलं की दम लागणं, थकवा येणं, गुदमरल्या सारख होणं, छातीत दुखणं आणि हृदयाचे ठोके अचानक वाढणं, हे सर्व हृदयाच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होऊन हार्ट अटॅक येण्याचे संकेत आहेत.
याशिवाय हृदयविकार, डायबिटीज आणि बीपी असलेल्या रुग्णांमध्ये छातीत दुखणे किंवा दाब येणे, हे हार्ट अटॅकचे लक्षणं असू शकते.
धोक्याचे संकेत मिळाल्यावर काय करावे?
वर सांगितल्याप्रमाणे असे जर धोक्याचे संकेत आढळल्यास लगेच कार्डियोलॉजिस्टकडे जाणे गरजेच आहे. जर हृदयविकार, डायबिटीज किंव्हा बीपी सारख्या आजारांची फॅमिली हिस्ट्री असेल तर फुल बॉडी चेकअप करून घ्या.
हार्ट अटॅक आल्यास काय करावे?
हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये छातीत तीव्र वेदना, जडपणा, जबडा, पाठ किंवा डाव्या हाताला मुंग्या येणे, घाम येणे आणि अस्वस्थता वाटणे अशी लक्षणे आढळल्यास, तुम्ही ताबडतोब मदतीसाठी एमरजेंसी मेडिकल हेल्प लाइन नंबरवर कॉल करा.
काय आहे उपाय?
जर ७५ टक्क्यांहून अधिक लक्षणे असतील तर त्या रुग्णांवर अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करुन उपचार केले जातात, आणि ७० टक्क्यांपेक्षा कमी ब्लॉकेज असतील तर रुग्णांवर औषधोपचार केले जातात.
हृदय आरोगी ठेवण्यासाठी काय करावे
१) तंबाखु आणि मद्य सेवन बंद करणे.
२) रोज ७-८ तास झोप घेणे आवश्यक.
३) वजन कंट्रोल करणे.
४) व्यायम करत जंक फुड न खाता हेल्दी लाईफस्टाइलचा स्वीकार करणे.
ही प्राथमिक महिती असुन काही त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.