Heart Attack : गेल्या काही वर्षांपासून देशात हार्ट अटॅकचे प्रमाण अधिक वाढले आहे. हार्ट अटॅक येण्यामागे अनेक कारणे समोर आली आहे पण त्यात सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली.
चुकीची जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयी हार्ट अटॅकचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. सहसा हार्ट अटॅक हा वयोवृद्ध व्यक्तींमध्ये आढळून यायचा मात्र गेल्या काही वर्षांपासून तरुणांमध्येही हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. (these three bad habits causes heart attack read story )
हार्टला योग्य रक्तपुरवठा न मिळाल्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. शरीरावरची अतिरीक्त चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर चुकीच्या गोष्टीमुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. चला तर अशा तीन चुकीच्या सवयी जाणून घेऊया ज्यामुळे हार्ट अटॅक कधीही येऊ शकतो.
वजन नियंत्रणात नसणे
हल्ली बदलत्या जीवनशैलीनुसार अनेकांमध्ये वजन वाढीच्या समस्या दिसून येतात. वजन वाढीमुळे अनकंट्रोल बीपी, कोलेस्टेरॉल, उच्च ट्रायग्लिसराइड, मधुमेहाचाही धोका वाढतो आणि सर्वांचा परिणाम थेट हार्टवर होतो. हार्ट अटॅक पासून वाचायचं असेल तर वजन नियंत्रणात ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
शारीरीक निष्क्रियता
प्रत्येकाला आराम हा हवा असतो पण तुम्ही गरजेपेक्षा जास्त आराम करत असाल तर ही सवय तुम्हाला हार्ट अटॅकच्या अगदी जवळ आणू शकते. या सवयीमुळे हार्टचा धोका वाढण्याची शक्यता असते. शारीरीक निष्क्रियता कधीही आणू नका यामुळे शरीरात फॅट जमा होतं. हे फॅट रक्तवाहिन्या ब्लॉक करतं. यासाठी दररोज व्यायम करणे गरजेचं आहे.
धुम्रपान करणे आणि स्ट्रेस
धूम्रपान शरीरासाठी खूप धोकादायक आहे तरीसुद्धा अनेक लोक धुम्रपान करतात पण तुम्हाला माहिती आहे जे लोक धुम्रपान करतात ते लोक अति जास्त स्ट्रेसमध्ये असतात. अति स्ट्रेसमुळेही हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. याशिवाय धुम्रपानामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.