Uric Acid Control Tips : सध्याचे धावपळीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या सुरू झाल्या आहेत. निरोगी आरोग्यासाठी तुम्हाला योग्य संतुलित आहार, भरपूर पाणी पिणे आणि व्यायाम यांची सांगड घालावी लागते.
परंतु, आजकाल कमी प्रमाणात पाणी पिणे, फास्टफूडचा अतिरेक, मद्यपान आणि असंतुलित आहार इत्यादींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, लठ्ठपणाची समस्या आणि इतर आजारांचे प्रमाण वाढत आहे. या आजारांमध्ये युरिक अॅसिडचा ही समावेश आहे.
शरीरात जर युरिक अॅसिडची पातळी वाढली किंवा त्यावर नियंत्रण मिळवता नाही आले तर, हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे, युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी आज आम्ही काही फळभाज्यांबद्दल सांगणार आहोत. या भाज्यांचा जर तुम्ही आहारात समावेश केला तर तुम्हाला युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवता येणार आहे.
युरिक अॅसिडला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काकडीचा आहारात समावेश करू शकता. काकडीमुळे आपल्या आरोग्याला आणि त्वचेला ही भरपूर फायदे होतात. काकडी खाल्ल्याने तुम्हाला बऱ्यापैकी आराम मिळू शकेल.
ब्रोकोलीमध्ये असणाऱ्या पोषकघटकांमुळे ती आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. ब्रोकेलीचे सेवन केल्याने युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. यासाठी आहारात ब्रोकोलीचा अवश्य समावेश करा.
बटाटा खायला सर्वांनाच आवडतो. बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्बोदके आणि फायबर्सचे प्रमाण आढळते. युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी बटाट्याचा आहारात जरूर समावेश करावा.
मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? की, बटाट्यासोबतच बटाट्याचा रस हा देखील युरिक अॅसिडच्या समस्येपासून तुमचा बचाव करण्यात मदत करू शकतो. या रसामुळे तुम्ही युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवू शकता.
कोबीची भाजी खायला सर्वांनाच आवडते. मात्र, काही जणांना कोबी आवडत नाही. परंतु, ज्या लोकांना युरिक अॅसिडची समस्या आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात कोबीच्या भाजीचा जरूर समावेश करावा.
युरिक अॅसिडच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोबीचे सेवन करणे महत्वाचे आहे. कोबीची भाजी ही मटार आणि सोयाबीनपेक्षा अधिक आरोग्यदायी आहे. युरिक अॅसिडमध्ये कोबीची भाजी ही अतिशय आरोग्यदायी आहे. त्यामुळे, ज्यांना युरिक अॅसिडच्या समस्येवर नियंत्रण मिळवायचे आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात कोबीचा समावेश करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.