Cholesterol Level : निरोगी राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. यासोबतच शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवणे देखील महत्वाचे आहे. आजकालचे धावपळीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
या गोष्टींमुळे कॉलेस्ट्रॉलची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कॉलेस्ट्रॉल वाढले की त्याचा परिणाम हृदयावर होण्याची शक्यता असते. तसेच, मधुमेहाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन बी १२ ची मदत घेऊ शकता.
हे जीवनसत्व कॉलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते. त्यामुळे, आहारात व्हिटॅमिन बी १२ ने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश नक्की करा. आज आपण त्या खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये व्हिटॅमिन बी-१२ चे मुबलक प्रमाण आढळते.
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन बी १२ चे विपुल प्रमाण आढळते. व्हिटॅमिन बी १२ चा उत्तम स्त्रोत म्हणून ब्रोकोलीला ओळखले जाते. वजन कमी करण्यासाठी देखील ब्रोकोलीचा आहारात समावेश केला जातो. कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्या आहारात ब्रोकोलीचा अवश्य समावेश करा. (Broccoli)
हिरवे वाटाणे खायला तर सगळ्यांनाच आवडते. अनेक खाद्यपदार्थांमध्ये हिरव्या वाटाण्यांचा वापर केला जातो. त्यासोबतच, हिरव्या वाटाण्यांपासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जाते. व्हिटॅमिन बी १२ चा उत्तम स्त्रोत म्हणून हिरव्या वाटाण्याला ओळखले जाते.
हिरव्या वाटाण्यांचा आहारात समावेश केल्याने हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. तसेच, शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वाटाणा उपयुक्त आहे. (Green Peas)
अंड्यामध्ये प्रथिने, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्सचे विपुल प्रमाण आढळून येते. प्रथिनांनीयुक्त असलेल्या अंड्यांचा आहारात समावेश केल्याने व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेवर मात करता येते. अंड्यामध्ये असलेले प्रथिने कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे, निरोगी राहण्यासाठी तुमच्या आहारात अंड्यांचा जरूर समावेश करा. (Eggs)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.