Yoga For Knee Pain : आपले जसे वय वाढते, तशा आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांमध्ये सांधेदुखी आणि गुडघेदुखीचा ही समावेश आहे. केवळ वृद्ध लोकांनाच नाही तर आजकाल तरूणांमध्ये सांधेदुखी आणि गुडघेदुखीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
सांध्यांमध्ये आणि गुडघ्यामध्ये वेदना होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे शारिरीक हालचाल न होणे. या शिवाय, जास्त तेलकट मसालेदार पदार्थ खाणे, अवेळी जेवणे, फास्टफूडचे अधिक सेवन आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे गुडघेदुखी सारख्या समस्या भेडसावतात.
या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी स्नायूंना बळकट करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आणि पायांना मजबूत करण्यासाठी तुम्ही नियमित काही योगासनांचा सराव करणे गरजेचे आहे. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.
त्रिकोणासनाचा नियमित सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. या योगासनाच्या सरावाने स्नायू मजबूत होतात आणि गुडघेदुखीपासून आराम मिळवता येतो. हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी सरळ रेषेत उभे रहा. तुमच्या दोन्ही पायांमध्ये दोन फूट अंतर ठेवा.
आता एक दीर्घ श्वास घेऊन तुमचे शरीर उजव्या बाजूला वाकवा. त्यानंतर तुमचा डावा हात वरच्या दिशेने न्या. आता तुमचे डोळे डाव्या हातांच्या बोटांवर स्थिर ठेवा. काही वेळ या स्थितीमध्ये ताठ रहा. त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.
ताण-तणाव कमी करण्यासाठी, गुडघेदुखी आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे. हे मलासन नियमित केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. हे योगासन करण्यासाठी सरळ रेषेत उभे रहा.
तुमच्या दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेवा आणि दोन्ही हात एकमेकांना जोडून नमस्कार मुद्रा करा. त्यानंतर, हळूहळू खाली बसा आणि श्वास सोडत पुढे वाका. या स्थितीमध्ये तुमच्या शरिराला ताण जाणवेल. आता काही सेकंद या स्थितीमध्ये ताठ रहा त्यानंतर श्वास सोडा आणि सामान्य स्थितीमध्ये या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.