Health Care News : 3 योगासने जी करतील ताण आणि चिंता छुमंतर, तणावावर राहील नियंत्रण....

तुम्हालाही या गोष्टींचा त्रास होत असेल, तर काही योगासनांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जाणून घ्या
Health Care
Health Caresakal
Updated on

आजकालचे धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली, अनियमित खाण्यामुळे तणाव ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक कारणांमुळे लोकांना तणावाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही बिघडू शकते. ही समस्या कोणत्याही वयात आणि कोणत्याही कारणाने कोणालाही होऊ शकते.

हेल्थलाइनच्या मते, योगा केल्याने तणावापासून आराम मिळतो. तुम्हीही तणावाचे शिकार असाल तर, योगा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. योगाची अशी अनेक आसने आहेत. जी मनाला आराम देतात. जर ही योगासने सकाळी केली, तर ती व्यक्तीला दिवसभर तंदुरुस्त राहण्यास मदत करतात.

भुजंगासन

भुजंगासन हे सर्वोत्तम योग आसनांपैकी एक मानले जाते. हा योग केल्याने मणक्याला बळकटी मिळते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भुजंगासन योग्य प्रकारे केल्याने तणाव आणि थकवा दूर होतो. त्या व्यक्तीला दिवसभर चांगले वाटते. जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली नसते. तेव्हा तो इतर कामंही चांगल्या प्रकारे करतो.

Health Care
Health Care News : उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करेल 'या' फळांचा आणि भाज्यांचा रस..

शवासन

जर तुम्ही शवासन केले तर ते तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. शवासनाची खास गोष्ट म्हणजे ते तुमच्या शरीराला पूर्णपणे आराम देते. हे योगासन उच्च रक्तदाब आणि चिंताग्रस्त लोकांसाठी रामबाण उपाय आहे. याशिवाय हे आसन केल्याने मेंदूलाही फायदा होतो. तज्ज्ञांच्या मते, हे आसन तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवते. या आसनामुळे तुमची एनर्जी लेव्हल वाढते.

कपाल भाती

कपाल भाती श्वसनाच्या रुग्णांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. कपाल भाती रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास मदत करते. या योग आसनामुळे फुफ्फुसाची क्षमता वाढते. त्याचबरोबर शरीरात साचलेले विषारी पदार्थ बाहेर टाकतात. तसेच, जर तुम्हाला तणावाचा त्रास होत असेल तर हे तुमच्यासाठी खूप प्रभावी आसन असू शकते. हे केल्यावर तुम्हाला मानसिकदृष्ट्याही शांत वाटेल.

Chitra kode:

Related Stories

No stories found.