Back Pain Exercises : पाठदुखीच्या त्रासाने हैराण आहात? मग 'हे' सोपे व्यायाम करा घरच्या घरी मिळेल आराम

तुमचं वय कितीही असो, आजकाल पाठदुखीचा त्रास लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच जाणवतोय.
Back Pain Exercises : पाठदुखीच्या त्रासाने हैराण आहात? मग 'हे' सोपे व्यायाम करा घरच्या घरी मिळेल आराम
Updated on

पाठदुखी ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. तुमचं वय कितीही असो, आजकाल पाठदुखीचा त्रास लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच जाणवतोय. तसेच खुर्चीवर सतत बसून राहिल्‍याने पाठीच्या खालच्‍या भागात समस्या उद्भवू शकतात. आज आम्ही तुम्हाला पाठीचं हे दुखणं कमी करण्यासाठी काही योगासनं सांगणार आहोत.

मार्जारासन 

हे आसन कसे कराल?

मार्जारासन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर बसावे. मग दोन्ही गुडघे पुढे नेऊन गुडघ्यांवर बसावे.

आता तुमचे दोन्ही हात गुडघ्याच्या पुढे न्या आणि योगा मॅटवर टेकवा. तुमची छाती आणि हनुवटी उचला आणि तुमचे शरीर वर उचला.

मग एक लांब श्वास घ्या आणि डोक्याचा भाग मागच्या बाजूला आणा. 

श्वास घ्या आणि पुन्हा मार्जारासन मुद्रा घ्या.

Back Pain Exercises : पाठदुखीच्या त्रासाने हैराण आहात? मग 'हे' सोपे व्यायाम करा घरच्या घरी मिळेल आराम
Monsoon Health Care : मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात करा या 5 गोष्टी, आजार दूर राहतील

बालासन योग

हे आसन कसे कराल? 

बालासन करण्यासाठी सगळ्यात आधी योगा मॅटवर बसा.

त्यानंतर पायाचे तळवे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करा.

गुडघे शक्य होतील तेवढे एकमेकांपासून दूर करा.

आता कंबरेतून खाली वाका आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये तुमचे पोट, छाती असेल, अशा पद्धतीने शरीराची अवस्था घ्या.

डोके खाली जमिनीवर टेकवा आणि हात समोरच्या बाजूने सरळ रेषेत पसरवा.

भुजंगासन

या आसनात पाठीच्या कण्याची स्थिती भुजंगासारखी होत असल्यानं या आसनाला भुजंगासन म्हणतात.

भुजंगासन करताना सर्वप्रथम जमिनीवर पालथं झोपून पाय सरळ ठेवा. हनुवटी जमिनीवर टेकवा.

दोन्ही हात छातीच्या जवळ ठेवा. कपाळ जमिनीला लावा. त्यानंतर हळूवारपणे शरीराचा वरील भाग म्हणजे बेंबीपर्यंतचा भाग वर उचला.

हातांचा आधार घेत तुमचं शरीर जमिनीपासून उचलून मागं टाचेच्या दिशेनं खेचा.

नंतर डोकं मागे घेऊन हात जमिनीवर सरळ येतील असं पाहावं आणि अंतिमतः श्वास सोडत पोट, छाती आणि डोकं जमिनीवर टेकवा.

Shabda kode:

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com