Throat Pain हिवाळ्यात वारंवार घसा दुखतोय ? हे घरगुती उपाय ट्राय करा

सर्व मिश्रण एकत्र करून गॅसवर ठेवून मंद आचेवर काढा उकळवा
health news
health newssakal
Updated on

घसादुखी ही बराच काल त्रास देणारा एक प्रकार. याबद्दल आयुर्वेदीय उपाय काय करता येतील हे आपण पाहत आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घेऊन उपाय योजना करणे आवश्यक आहे. काही असे उपाय जे घरी करून बघणे सोपे आणि सुरक्षित आहे, त्यामध्ये गंडूष विधीची माहिती आपण मागील भागात पाहिली.

घसा हा अवयव फार पटकन रूष्ट होणारा अवयव असल्यामुळे यासाठी करावी लागणारी उपाय योजना ही नेहमी दीर्घकाळ करावी लागते. यामध्ये सकाळी उठून करावयाचे काही साधे उपाय पाहू...

सकाळी उठल्यावर दात घासून झाल्यावर, एक चिमुट हळद पावडर अर्धा चमचा मधात मिसळावी. या मिश्रणाने दातांच्या हिरड्या घासाव्यात. आपोआप भरपूर लाळ सुटते ती हळदीबरोबर गिळून टाकावी.

त्यानंतर १ ग्लास कोमट पाण्यात एक चिमुट हळद पावडर घालून पुन्हा गुळण्या कराव्यात. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना काढा घ्यावा. यासाठी २ कप पाणी घेऊन त्यामध्ये ५ तुळशीची पाने, ५ काळे मनुके, १ इंच दालचिनीचा तुकडा घालावा. घसादुखी बरोबर कफ असेल तर एक काळी मिरी काढ्यात घालावी. सर्व मिश्रण एकत्र करून गॅसवर ठेवून मंद आचेवर काढा उकळवा. निम्मा म्हणजे एक कप शिल्लक राहू द्यावा. गळून घेऊन हा काढा सकाळी प्यावा. काढा गाळल्यानंतर जो चोथा उरतो तो लगेच फेकून देऊ नये. रात्री झोपताना त्याच चोथ्यामधे १ कप पाणी टाकून ते थोडे उकळून घ्यावे व गाळून प्यावे. याला निकाढा असे म्हणतात. हे काढ्याचे सौम्य स्वरूप असते. या काढ्यामध्ये कोणतेही उष्ण द्रव्य टाकलेले नाही. त्यामुळे हा जास्त दिवस नियमितपणे घेतला असता त्याचा कोणताही त्रास होत नाही. हळूहळू घसा मोकळा होत जातो.

विड्याचे पान हा देखील घसादुखीवरील एक उत्तम उपाय आहे. एक विड्याचे पान घेऊन त्यामध्ये थोडी बडीशेप, एक चिमुट ज्येष्ठमध आणि अगदी किंचित काथ घालून तो विडा जेवणानंतर खावा. या पानाला चुना लावू नये.

आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे पान खावे. त्यामुळे घशात साठलेला कफ कमी होत जातो आणि त्यामुळे घसा मोकळा होत जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.