आनंदाचा आणि धावपळीचाही काळ

आई होण्याची चाहूल लागली, तेव्हा मी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कुंकू’ या मालिकेत अभिनय करत होते.
Actress Deepti Kelkar
Actress Deepti Kelkarsakal
Updated on

- दीप्ती केतकर

आई होण्याची चाहूल लागली, तेव्हा मी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘कुंकू’ या मालिकेत अभिनय करत होते. ही मालिका मी सहा ते सात महिने केली, म्हणजेच माझ्या गर्भावस्थेच्या काळात मी या मालिकेत अभिनय केला. या मालिकेसाठी मला सहायक अभिनेत्रीचा ‘झी मराठी पुरस्कार’ही मिळाला. त्या काळात करिअरबाबत तडजोड करावी लागली नाही. फक्त स्वतःची काळजी घेत होते. माझ्या सहकलाकारांनी, दिग्दर्शकांनी आणि ‘कुंकू’च्या संपूर्ण टीमने माझी खूप काळजी घेतली. त्यांच्या प्रेमळ साथीत, हा प्रवास सुंदर आणि सहज झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.