व्हायग्राच्या ओव्हरडोसमुळे तरुणावर शस्त्रक्रिया करून घेण्याची वेळ

अशा स्थितीत शिश्न चार तासांपेक्षा अधिक काळ उत्तेजित होते. या तरुणाच्या पत्नीने ही स्थिती ओळखल्यानंतर डॉक्टरांना माहिती दिली.
viagra
viagragoogle
Updated on

मुंबई : नपुंसकतेवरचा उपाय म्हणून घेतल्या जाणाऱ्या वायग्रा या औषधाच्या गोळीने एका २८ वर्षीय तरुणाला चांगलेच अडचणीत आणले. लग्नानंतर तीनच महिन्यांत या तरुणाने अविवेकीपणाने या गोळ्यांचे सेवन केल्याने त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. प्रयागराज येथील एमएलएन वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी या तरुणाला संकटातून बाहेर काढण्यासाठी दुर्मीळ penile prosthesis surgery केली.

viagra
कशी ओळखाल तुमच्या जोडीदाराची लैंगिक व्यसनाधीनता ? ही आहेत लक्षणे...

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले. त्याने मित्रांच्या सांगण्यावरून वायग्रा घेण्यास सुरुवात केली. त्याने आवश्यक प्रमाणापेक्षा जास्त म्हणजेच २०० मायक्रोग्रॅमपर्यंतची मात्रा घेण्यास सुरुवात केली. परिणामी तो धोकादायक स्थितीत पोहोचला. त्याच्यात priapism नावाची स्थिती निर्माण झाली व सातत्याने शिश्नाला येणाऱ्या उत्तेजनामुळे त्याला वेदना होऊ लागल्या. अशी स्थिती नपुंसकतेच्या औषधांमुळे उद्भवते.

viagra
या काही छोट्या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

अशा स्थितीत शिश्न चार तासांपेक्षा अधिक काळ उत्तेजित होते. या तरुणाच्या पत्नीने ही स्थिती ओळखल्यानंतर डॉक्टरांना माहिती दिली. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी या तरुणाचे समुपदेशन केले. त्यानंतर दोन महिन्यांनी penile prosthesis surgery करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये माणसाच्या शरीरात एक उपकरण बसवले जाते जे त्याला नपुंसकतेवर मात करण्यास मदत करते. यानंतर हा तरूण सुखी वैवाहिक आयुष्य जगू शकतो.

तरुणाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले. अशाप्रकारे लोकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय गोळ्या घेऊ नयेत. मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना डॉक्टरांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.