Less Exercise can Increase Difficulties : तुम्हाला कधी जाणवले आहे का? तुम्ही जितकी एक्सरसाईज करण्याचे ठरवले किंवा जितके पुश-अप मारण्याचे ठरवता, ते पूर्ण करण्याआधीच तुम्ही थकून जाता. तुमची अवस्था अशी होते की, आता मी अजून काही करू शकत नाही आणि त्यानंतर पुश-अप किंवा व्यायाम करणे अवघड वाटू लागते. या प्रश्नाचे उत्तर इंग्लंडच्या यूनिवर्सिटी ऑफ लीड्सच्या संशोधकानद्वारे ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या (British Heart Foundation) सहकार्याने केलेल्या एक संशोधनामध्ये दिले आहे.
या संशोधनानुसार, ब्लड फ्लो सेन्सरचे काम करणाऱ्या पायझो-१ (piezo1 protein) नावाच्या प्रथिनाच्या निष्क्रियतेमुळे ही स्थिती उद्भवते. यात स्नायूंमध्ये रक्त वाहून नेणाऱ्या पेशींची (केशिका) घनता कमी होते आणि या मर्यादित रक्तप्रवाहामुळे अॅक्टिव्ह राहणे किंवा फिजिकल अॅक्टिव्हिटी करणे अधिक कठीण होते.
या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रकाशित झाले आहेत. संशोधकांच्या मते, हे निष्कर्ष बायोलॉजिकल प्रोसेसला समजून घेण्यास मदत करतात की, व्यायाम (Excersize) जितक कठीण असते, ती तेवढी कमी केली जाते.
या अभ्यासादरम्यान उंदरांवर प्रयोग करण्यात आले आहेत, पण पायझो-१ प्रथिन मानवांमध्येही आढळते. यावरून असे म्हणता येईल की,''मानवाच्या कृती समान असतील. अभ्यासादरम्यान, शास्त्रज्ञांनी उंदरांना दोन गटांमध्ये विभागले, एक नियंत्रण (Control) गट आणि दुसरा गट ज्यांचे पायझो स्तर 1-10 आठवडे विस्कळीत झालेल्या स्थितीत(disrupted) होते. दोघांची तुलना करताना असे आढळून आले की, पायझो-१ च्या विस्कळीत गटातील उंदरांचे चालणे, धावणे आणि इतर शारीरिक हालचाली पायझो-१च्या खालच्या पातळीसह कमी झाल्या आहेत. हे सूचित करते की, पायझो-१ सामान्य शारीरिक हालचालींसाठी महत्वाची भूमिका बजावते.
युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधक आणि या अभ्यासाच्या मुख्य लेखक फिओना बार्टोली म्हणतात की, व्यायामामुळे आपल्याला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (Cardiovascular), मधुमेह, नैराश्य आणि कर्करोगाचा धोका असतो. पण दुर्दैवाने अनेक कारणांमुळे लोकांना व्यायाम करू शकत नाही. असी परिस्थिती लोकांचे आरोग्यासाठी धोका वाढविणारी आहे. जे लोक कमी व्यायाम करतात ते कमी तंदुरुस्त राहतात आणि ही स्थिती बिघडत जाते. अभ्युसानुसार, शारीरिक हालचाल आणि पायझो-१मधील शारीरिक कार्यक्षमतेबाबत महत्त्वाचा संबध समोर आले आहे. व्यायामाद्वारे पायझो-१ ला अॅक्टिव्ह ठेवणे आपल्या शारीरिक कार्यक्षमतेसाठी आणि आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
हा अभ्यास दुसरे लेखक प्रोफेसर डेव्हिड बीच यांचे मतानुसार आमचा अभ्यास दर्शवितो की, रक्तवाहिन्यांची भूमिका म्हणजेच रक्तवाहिन्या पायझो-१ शारीरिक हालचालींशी संबंधित आहेत. रक्तवाहिन्यांच्या विकासामध्ये पायझो-१ भूमिका ज्ञात आहे, परंतु प्रौढांमधील रक्तवाहिन्यांच्या ताकदीबद्दल फारसे माहिती नाही.. हा अभ्यास स्नायूंच्या कार्यक्षमतेचे नुकसान टाळण्यासाठी उपाय शोधण्यात मदत करेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.