वजन कमी करण्यासाठी...!

मागच्या लेखात आपण पाहिले दिवाळीमध्ये फराळ आणि वजनाबाबत चर्चा केली. तुमच्यापैकी अनेक जणांनी भरपूर मिठाई, तळलेले पदार्थ खाल्ले असतील.
To lose weight healthy diet water intake exercise
To lose weight healthy diet water intake exercise Sakal
Updated on

मागच्या लेखात आपण पाहिले दिवाळीमध्ये फराळ आणि वजनाबाबत चर्चा केली. तुमच्यापैकी अनेक जणांनी भरपूर मिठाई, तळलेले पदार्थ खाल्ले असतील. व्यायामाअभावी त्यांचे वजनही वाढले असेल. ते कसे कमी करावे, त्याबाबची माहिती आपण या लेखामध्ये घेऊयात.

अनेकजण व्यायाम करावा लागू नये म्हणून सकाळी उठून कोमट पाणी, मध पाणी, लिंबू पाणी पिणे अशा गोष्टी करतात. परंतु शरीरातील चरबी कमी करायची असल्यास व्यायामाशिवाय पर्याय नाही. दररोज कमीत कमी ४५ मिनिटे व्यायाम करावा.

कारण आपले पहिले ३० मिनिटे शरीरातून फक्त पाणी बाहेर पडते आणि तीस मिनिटानंतर चरबी कमी व्हायला सुरुवात होते. तुम्ही तीस मिनिटांपेक्षा कमी व्यायाम करत असाल तर चरबीमध्ये आणि वजनामध्ये काही फरक दिसणार नाही.

तुम्ही काहीही व्यायाम करू शकता जसे की धावणे, जोरात चालणे, पोहणे सायकल चालवणे, दोरीच्या उड्या मारणे हे सगळे व्यायाम ४५ मिनिटे करणे अपेक्षित आहे. तुम्ही असेही करू शकता ३० मिनिटे जोरात चालले आणि पंधरा मिनिटे दोरीच्या उड्या असं ४५ मिनिट तरी चालेल.

तुम्ही जिम लावू शकता. परंतु जिमचा ट्रेनर, त्याची पात्रता नक्की विचारावे. कारण अनेकदा जिम ट्रेनर चुकीचे प्रोटीन सप्लीमेंट सुचवतात, त्यामुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणताही आहाराचा सल्ला योग्य पात्रताधारक तज्ज्ञांचाच घ्यावा.

अतिरिक्त साखर टाळा

दिवाळीच्या सणात आपण सर्वांनी मिठाई आणि प्रक्रिया केलेल्या अन्नातून खूप जास्त साखर सेवन केली आहे. म्हणून, दोन आठवडे साखरयुक्त अन्न पूर्णपणे टाळण्याची वेळ आली आहे. किमान दोन आठवडे बेकरीचे पदार्थ, मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, केक आणि बिस्किटांना नाहीच म्हणा!

भरपूर पाणी प्या

दररोज किमान ८-९ ग्लास पाणी पोटात जाईल याची खात्री करा. पाणी जात नसेल तर लिंबू पाणी, नारळ पाणी भाज्यांचे रस जसे की काकडीचा रस बीट रस हे द्रव पदार्थ घेऊ शकता. पुरेशा द्रव पदार्थांसह हायड्रेटेड राहिल्याने शरीराला घाम आणि लघवीद्वारे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल आणि चरबी कमी करायला देखील मदत होते.

मांस खाणे टाळा

तुमच्या पचन संस्थेवर कमीत कमी दबाव टाकण्यासाठी आठवडाभर तुमचे जेवण हलके ठेवण्याचा प्रयत्न करा. लाल मांसाऐवजी वनस्पती-आधारित आहार निवडा, जो पचण्यास सोपा असेल. त्यानंतर तुम्ही हाय प्रोटीन डाएट घेऊ शकता त्याच्यामध्ये उकडलेली वाफवलेले चिकन मासे अंडे खाऊ शकता.

आहारात फायबरचा समावेश

फायबर शरीराला डिटॉक्सिफाय करण्यात खूप मदत करू शकते. काही फायबरयुक्त पदार्थ सेवन केल्याने आतड्यांच्या भिंतीवरील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होईल. काकडी, गाजर, लेट्युस, अंकुरलेले कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.