नवी दिल्ली : भारतात पदवीशिवाय आणि वैद्यकीय मान्यतेशिवाय औषधोपचार आणि शस्त्रक्रिया करत असलेल्यांचे अनेक प्रकार अधुनमधून समोर येत असतात, याद्वारे रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जातो. पण आता केंद्र सरकार यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
त्यानुसार, आता साप-विंचवाचं विष उतरवणारे, कावीळ उतरवणारे आणि निळखलेले सांधे बसवणे, असे पारंपारिक उपचार करणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून अधिकृत परवाने देण्यात येणार आहेत. (Traditional Medicine those who remove poisons fix dislocated bones will get an official license Center planning)
सरकारचं स्पष्टीकरण
एका सरकारी अधिकाऱ्यानं याबाबत सांगितलं की, "पारंपारिक औषधोपचार करणाऱ्या या लोकांकडं मोठा अनुभव असतो, ते तज्ज्ञ असतात. पण त्यांच्याकडं औपचारिक पदवी नसते, त्यामुळं त्यांना सामाजिक स्वाकार्हता नसते. त्यामुळं सरकारच्या वैद्यकीय व्यवसायांना प्रमाणपत्र देणाऱ्या स्वायत्त संस्थेमार्फत जसे क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाकडून या लोकांना प्रमाणित करण्याचा विचार सरकार करत आहे. (Latest Marathi News)
पण अशा पारंपारिक वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांकडं स्कील आणि पुरेस ज्ञान असणं गरजेचं आहे" तसेच "अशा प्रकारे पारंपारिक पद्धतीनं उपचारांची प्रॅक्टिस करणाऱ्यांना जर प्रमाणित केलं तर त्यांना उत्पन्न वाढीसाठी मदत होईल," असं दुसऱ्या एका सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. पण दोघांनीही आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. लाईव्ह मिंटनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Marathi Tajya Batmya)
आयुष मंत्रालयाचा प्रस्ताव
भारतात सध्या आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार काम करणाऱ्या फिजिशिअन डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळं ही पोकळी भरुन काढण्यासाठी इतर वैद्यकीय पर्यायांमध्ये दुवा साधला गेला पाहिजे, विशेषतः दुर्गम, ग्रामीण भागांमध्ये, असा विचारही पुढे येत आहे. अशा प्रकारचे पारंपारिक उपचार पद्धती केंद्राच्या आयुष मंत्रालयाच्या आखत्यारित येतं. यामध्ये आयुर्वेद, योग, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्धी आणि होमियोपॅथीचा समावेश होतो.
भारतातील डॉक्टरांचं प्रमाण
दरम्यान, केंद्रानं या वर्षाच्या सुरुवातीला लोकसभेत सांगितलं होतं की, भारतात सध्याच्या घडीला केवळ १.३ मिलियन अर्थात १३ लाख अॅलोपॅथी फिजिशिअन आहेत. यामध्ये पारंपारिक पद्धतीनं औषधोपचार करणाऱ्यांचाही समावेश आहे. देशाचा सध्या डॉक्टर्स आणि लोकसंख्येचं प्रमाण हे 1:834 इतकं आहे. जे जागतीक आरोग्य संस्थेच्या 1:1000 यापेक्षा चांगलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.