- सृष्टी जैन, अभिनेत्री
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी मी वेट ट्रेनिंग, योगा आणि चालणे अशा सगळ्याच गोष्टी मिक्स आणि मॅच करते. सेटवर असताना मला जमेल तेवढे मी चालते; कारण माझा बहुतेक वेळ तिथेच जातो. मानसिक आरोग्यासाठी मी ध्यान करते. ध्यान करायला सुरूवात करायला लागल्यापासून माझ्या मानसिक आरोग्यामध्ये मी परिवर्तन पाहिले आहे. मी जिमलाही जाते. तेथे स्ट्रेन्थ ट्रेनिंग आणि अन्य कार्डिओ व्यायाम करते.