Trigeminal Neuralgia : चेहऱ्याच्या काही भागात होणाऱ्या असह्य वेदनेमुळे ब्रश न करू शकणाऱ्या किंवा साधी चूळही न भरू शकणाऱ्या ६५ वर्षीय महिलेला रेडिओफ्रिक्वेंसी ऍब्लेशनसारख्या अत्याधुनिक उपचारपद्धतीमुळे नवे जीवदान मिळाले आहे. नेहमीच्या तीव्र वेदनांमुळे 'सुसायडल डिसीज' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'ट्रायजेमिनल न्यूराल्जिया' ह्या आजाराने त्या ग्रस्त होत्या.
त्या महिलेने घेतलेल्या न्यूरोलॉजिस्ट आणि डेंटिस्टच्या उपचारानंतरही त्यांना आराम मिळाला नाही. पण 'पेनेक्स'मध्ये केलेल्या रेडिओफ्रिक्वेंसी ऍब्लेशननंतर त्यांना त्वरित आराम मिळाला आणि अवघ्या दोन आठवड्यांतच त्या आपले जुने औषधोपचार बंद करू शकल्या. ह्या उपचाराला आता अनेक महिने उलटून गेले असून, त्या सध्या एक सामान्य आणि वेदनारहित जीवन जगत आहेत.
ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे. ब्रश करताना किंवा चूळ भरताना चेहऱ्याच्या काही भागात होणाऱ्या असह्य वेदना हे ह्या विकाराचं प्रमुख लक्षण आहे. त्यांनी आपल्याला होणाऱ्या असह्य वेदनांमुळे कित्येक दिवस ब्रश करणे आणि तोंड धुणे बंद झाल्यामुळे त्यांचे तोंडाचे आरोग्य पूर्णतः बिघडले होते. ह्या वेदना इतक्या वाढल्या की त्यांनी आपले आयुष्य संपविण्याचाही विचार केला होता.
यावर उपाय म्हणून त्या त्यांच्या डेंटीस्टकडे गेल्या आणि वेदना कमी होतील ह्या आशेने बरेचसे दातही त्यांनी काढून घेतले. दुर्दैवाने, त्यांना ह्यामुळे काही फरक पडला नाही. पुढे त्यांनी एका न्यूरोलॉजिस्टकडून काही औषधे घेतली, ज्यामुळे त्यांना थोडाफार आराम मिळाला. पण त्या गोळ्यांमुळे येणाऱ्या गुंगी आणि असंतुलनामुळे त्यांच्यासमोर नवी आव्हाने आ वासून उभी राहिली.
त्याचवेळी त्यांना 'पेनेक्स' ह्या पेन मॅनेजमेंट क्लिनिकबद्दल माहिती मिळाली. त्यांच्यावर रेडिओफ्रिक्वेंसी ऍब्लेशन सर्जरी करण्यात आली. ह्या प्रक्रियेत अगदी कमीत कमी चिरफाड करून प्रभावित नसांवर काम केले जाते, ज्यामुळे वेदनेपासून त्वरित आराम मिळतो. ही उपचारपद्धती यशस्वी ठरली आणि केवळ दोनच आठवड्यांत त्यांनी आपले जुने औषधोपचार बंद केले.
रेडिओफ्रिक्वेंसी ऍब्लेशन झाल्यानंतर गेली दीड वर्षे ती महिला एक सामान्य, वेदनारहित आयुष्याचा आनंद घेत आहेत. आमच्या या उपचारानंतर रुग्णाच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाल्याचे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे.
जगभरातील १ लाख जणांपैकी अंदाजे ४ ते १३ जण ट्रायजेमिनल न्यूराल्जियाने ग्रस्त असतात. हा विकार दुर्मिळ असला तरी तो असह्य असतो. या प्रगत उपचार पद्धतीमुळे त्यांना त्वरित आराम मिळाला असून केवळ दोन आठवड्यांत त्यांची औषधे बंद करण्यास यश मिळाले. त्यांचे जीवन वेदनामुक्त करण्यात आम्ही यशस्वी झालो याचा आम्हाला आनंद आहे आणि हे फक्त प्रगत अशा वेदना मुक्त उपचारामुळे शक्य झाले आहे, अशी माहिती पेनेक्स क्लिनिक चे डॉ. काशिनाथ बांगर यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.