Healthy Snacks After Workout : वर्कआऊट केल्यानंतर खा 'हे' हेल्दी स्नॅक्स, वजन कमी करण्यासोबतच तुमचे आरोग्य राहील उत्तम

Healthy Snacks After Workout : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, गरजेचे आहे. आजकाल लोक या दोन्ही गोष्टींबद्दल जागरूक झाले आहेत. ही एक चांगली बाब आहे.
Healthy Snacks After Workout
Healthy Snacks After Workoutesakal
Updated on

Healthy Snacks After Workout : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, गरजेचे आहे. आजकाल लोक या दोन्ही गोष्टींबद्दल जागरूक झाले आहेत. ही एक चांगली बाब आहे. जर तुम्ही शारिरीकदृष्ट्या सक्रिय नसाल आणि दिवसभर फक्त बसून राहिलात तर तुमचे वजन वाढणार, यात काही शंका नाही.

वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल तुम्ही साधल्यास तुमचे आरोग्य निरोगी आणि राहील आणि वजन देखील नियंत्रणात राहील. अनेकदा वर्कआऊट किंवा व्यायाम केल्यानंतर जास्त भूक लागते.

या स्थितीमध्ये व्यायाम केल्यानंतर काही जण चुकीचा आहार घेतात. त्यामुळे, तुमची मेहनत पूर्णपणे वाया जाऊ शकते. जर तुम्ही वर्कआऊट केल्यानंतर हेल्दी स्नॅक्स घेतले तर, तुमच्य शरीराला ऊर्जा ही मिळते आणि वजनही सहज कमी होते. आज आम्ही तुम्हाला वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही कोणते हेल्दी स्नॅक्स खायला हवेत? त्याबद्दल सांगणार आहोत.

Healthy Snacks After Workout
Post Workout Meal : वर्कआऊट केल्यानंतर थकवा आलाय? मग, 'या' खाद्यपदार्थांचे करा सेवन

बेसन चिला

बेसनपीठाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. त्यामुळे, यापासून बनवलेल्या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही बेसनपीठापासून बनवलेला चिला खाऊ शकता. हा एक हेल्दी ऑप्शन आहे. हा बेसन चिला खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला जीवनसत्वे, प्रथिने आणि फायबर्सचा पुरवठा होईल. यामुळे, शरीराला पोषकघटक ही मिळतील आणि तुमचे वजन देखील नियंत्रणात राहील. (besan chilla)

पनीर सॅलेड

प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून पनीरला ओळखले जाते. पनीरचे सेवन केल्याने पोट ही भरते आणि शरीराला आवश्यक असणारे पोषकघटक देखील मिळतात. वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही पनीरचे सॅलेड खाऊ शकता.

या पनीर सॅलेडमध्ये तुम्ही पनीर, कांदा, टोमॅटो, काकडी आणि काही हिरव्या भाज्यांचा ही समावेश करू शकता. यामुळे तुमचे पनीर सॅलेड खायला चवदार लागेल. शिवाय, हा एक बेस्ट हेल्दी ऑप्शन आहे.

वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही हेल्दी स्नॅक्समध्ये पनीर सॅलेडचा समावेश करू शकता. यामुळे, तुमचे वजन ही वाढणार नाही आणि तुमचे आरोग्य ही निरोगी राहण्यास मदत होईल. (paneer salad)

Healthy Snacks After Workout
Pineapple Health Benefits : दिसायला काटेरी पण करेल पचनाच्या समस्या दूर ! जाणून घ्या अननसाचे आरोग्यदायी फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.