Turmeric Benefits: नाभीवर हळद लावल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या होतील दूर, काय आहे महत्व?

हळदीचं ज्योतिष शास्त्रातही महत्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार नाभीवर हळद लावल्याने अनेक समस्या दूर होतात. तेव्हा जाणून घेऊयात नाभीवर हळद लावण्याचे फायदे
Turmeric Health Benefits in Marathi
Turmeric Health Benefits in MarathiEsakal
Updated on

भारतीय स्वयंपाकातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे हळद. स्वयंपाकाची चव वाढवण्यासोबतच हळदीचे अनेक फायदे आहेत. हळद आरोग्याच्यादृष्टीने महत्वाची आहे. एखादी जखम Wound बरी करणं असो किंवा चेहऱ्यावर Face ग्लो आणणं हळदीचे अनेक फायदे आहेत. Turmeric Use for Mental and Physical Health

हळदीमुळे Turmeric रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसचं त्वचेसाठी हळद बहुगुणकारी आहे. हळदीला तर तुम्ही तुमच्या नाभीवर लावलं तरी त्याचे अनेक फायदे आहेत. याचा तुमच्या संपूर्ण स्वास्थ्यावर Health प्रभाव पडतो. 

हळदीचं ज्योतिष शास्त्रातही महत्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार नाभीवर हळद लावल्याने अनेक समस्या दूर होतात. तेव्हा जाणून घेऊयात नाभीवर हळद लावण्याचे फायदे. Applying turmeric on navel benefits 

  • नाभीला आपल्या शरीराचा केंद्र बिंदू मानला जातो. नाभीवर हळद लावल्यास याचा लाभ आपल्या शरीरासोबतच मनालादेखील होतो असं पुर्वीपासून म्हंटलं जातं. 

  • नाभीवर हळदीचा टिळक लावल्यास आपल्या शरीरात उर्जेचा प्रवाह जलद गतीने वाढतो. यासाठीच ज्योतिष शास्त्रात आंघोळीनंतर नाभाला चिमुटभर हळद लावण्याचा सल्ला दिला जातो. 

  • जर एखाद्या महिलेला मासिक पाळीमध्ये असह्य वेदना होत असतील तर त्यांनी नाभीवर चिमुटभर हळद लावावी. यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होतील.

  • तर तुम्हाला सतत अपचन आणि पोट दुखीचा त्रास होत असेल तर नाभीवर हळद लावल्यास आराम मिळू शकतो. 

  • सतत पोटात दूखत असेल किंवा सूज आली असेल तर नारळाच्या तेलामध्ये हळद मिसळून हा लेप नाभीवर लावावा. यामुळे आराम मिळेल, तसचं नाभीवर जखम झाल्यास किंवा सूज आल्यासही हा लेप लावणं उपयुक्त ठरू शकतं. turmeric on navel

  • हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसचं अनेक संक्रमाणांपासून शरीराचा बचाव होतो. 

    हे देखिल वाचा-

Turmeric Health Benefits in Marathi
Turmeric Water च्या या उपयांनी येईल सकारात्मकता, पैशांची तंगी होईल दूर

नाभीवर हळद लावण्याचा आध्यात्मिक लाभ

आपल्या शरीरातील नाभीच्या भागाला आत्म्याचं आसन मानलं जातं. यामुळेच या भागात हळद लावल्याने आध्यात्मिक ऊर्जा सक्रिय करणं, आध्यात्मिक ओढ निर्माण होण्यासाठी आणि परमात्म्याशी एकरुप होण्यासाठी उत्तम स्त्रोत मानलं जातं. 

नाभीवर हळद लावल्याने मानवी शरीर थेट परमात्म्याशी जोडलं जातं आणि ईश्वर भक्ती मन केंद्रिंत होतं असं म्हंटलं जातं. Turmeric pack good for health 

हळदीचे मानसिक लाक्ष

असं म्हंटलं जात की हळदीमुळे मनावर शांत प्रभाव पडतो. हळदीला नाभीवर लावल्याने तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होतं. तसचं यामुळे मनाची स्पष्टता आणि शांतता वाढते. 

हळदीचे ज्योतिष शास्त्रीय फायदे

  • ज्योतिष शास्त्रानुसार नाभीवर हळद लावल्याने व्यक्तीच्या जीवनात धन आणि समृद्धी टिकून राहते. तसचं आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी नाभीवर हळदीचा लेप लावावा. Astrology turmeric benefits 

  • घरात निर्माण होणाऱ्या विविध समस्या दूर कऱण्यासाठी नाभीवर हळद लावणं फायदेशीर ठरू शकतं. 

  • नाभीवर हळद लावल्याने आपल्या शरीरावर एक वेगळाच प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार हळद व्यक्तीचं आकर्षण वाढवण्यास मदत करत. नाभीवर हळद लावल्याने नाते संबध सुधारण्यास मदत होते आणि इतरांकडून प्रेम मिळतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.