Ashok Saraf आणि Urfiला झालेला लॅरिन्जायटिस आजार तुम्हाला झाल्यास काय कराल ?

या आजारात माणसाच्या बोलण्यावर बंधनं येतात. कधीकधी आवाज पूर्णपणे गमवावाही लागतो. जाणून घेऊ या या आजाराची लक्षणे आणि उपाय.
Laryngitis
Laryngitissakal
Updated on

मुंबई : सध्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ लॅरिन्जायटिस (Laryngitis) या आजाराने ग्रस्त आहेत. या आजारामुळे त्यांना त्यांच्या नाटकाचे प्रयोगही थांबवावे लागले आहेत. गेल्या वर्षी हा आजार उर्फी जावेदलाही झाला होता.

या आजारात माणसाच्या बोलण्यावर बंधनं येतात. कधीकधी आवाज पूर्णपणे गमवावाही लागतो. जाणून घेऊ या या आजाराची लक्षणे आणि उपाय. हेही वाचा - दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

Laryngitis
Pollution Asthma : दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण थेट फुप्फुसांवर करत आहे आक्रमण

लॅरिन्जायटीसची लक्षणे काय आहेत ?

लॅरिन्जायटीसची लक्षणे तुमच्या घशातील सूज किती तीव्र आहे यावर अवलंबून असतात. लक्षणे अचानक येतात आणि पहिल्या तीन दिवसांत ती अधिकच वाढतात.

कर्कश्श आवाज, आपला आवाज गमावणे, सततचा त्रासदायक खोकला, घसा खवखवणे, घसा साफ करण्याची सतत गरज भासणे अशी या आजाराची लक्षणे आहेत.

इतर लक्षणे निघून गेल्यानंतरही तुमचा आवाज आठवडाभर पूर्णपणे सामान्य होत नाही. लॅरिन्जायटीस बहुतेकदा वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे होतो, जसे की सर्दी किंवा फ्लू. असे झाल्यास डोकेदुखी, सुजलेल्या ग्रंथी, वाहणारे नाक, थकवा आणि वेदना ही लक्षणे दिसतात.

लॅरिन्जायटीससाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे का ?

लॅरिन्जायटीस सामान्यतः एक ते दोन आठवड्यांत स्वतःहून बरा होतो. त्यामुळे वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नसते.

पण, तुमची लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ असतील, वेदना होत असतील किंवा गिळणे कठीण झाले असेल, आवाज परत येत नसेल तर डॉक्टरांकडे जा.

तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्यास, रुग्णवाहिका बोलवा किंवा ताबडतोब तुमच्या डॉक्टरांना भेटा.

Laryngitis
Thyroid Symptoms : बऱ्याचशा स्त्रियांना माहीत नसतात थायरॉइडची ही १२ लक्षणे

लॅरिन्जायटीसचा उपचार कसा करावा ?

बहुतेक प्रकरणांमध्ये, लॅरिन्जायटीसला उपचारांची आवश्यकता नसते आणि एक ते दोन आठवड्यांत तो स्वतःच बरा होतो.

बोलणे कमी करणे, भोवतालची हवा ओलसर ठेवणे टाळा (घरी ह्युमिडिफायर वापरा), कोमट खारट पाण्याने गुळण्या करणे हा उपाय असू शकतो. घशात जळजळ होऊ शकेल असे काहीही करणे टाळा. उदा.- धूम्रपान, कॅफिन आणि अल्कोहोल.

जर तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्हाला कफ औषध घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. तुमची लक्षणे कायम राहिल्यास, तुमच्या डॉक्टरांना भेटा. ते तुमच्या लक्षणांचे कारण तपासू शकतात.

जर तुमची लक्षणे बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे उद्भवली असतील तर तुमचे डॉक्टर प्रतिजैविके लिहून देऊ शकतात.

सूचना - या लेखातील माहिती सामान्य ज्ञानासाठी असून हा कोणत्याही समस्येवरील उपचार असू शकत नाही. अधिकृत माहितीसाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.