Urine Infection In Male : तुम्हाला मूत्रमार्गातील संसर्ग आहे, हे कसं ओळखाल?

संसर्ग मूत्राशयाला झालेला असेल, तरी तो संपूर्ण शरीरासाठी त्रासदायक होऊन बसतो
Urine Infection In Male
Urine Infection In Maleesakal
Updated on

Urine Infection In Male : यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) ही एक सामान्य समस्या आहे जी कोणत्याही व्यक्तीस उद्भवू शकते. यूटीआयला सामान्य भाषेत मूत्रमार्गाचा संसर्ग असं म्हणतात. सर्वसाधारणपणे यूटीआयची समस्या महिलांमध्ये जास्त असते. परंतु असे नाही की पुरुषांना यूटीआय असू शकत नाही. यूटीआय हा मूत्राशयाच्या संसर्गाचा एक प्रकार आहे, जो मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रमार्ग इत्यादींमध्ये सर्वात सामान्य आहे.

मूत्रमार्गाचा संसर्ग हा संपूर्ण मूत्रप्रणालीतील कोणत्याही भागास होऊ शकतो. मूत्रप्रणालीमध्ये मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रवाहक नलिका आणि मूत्रमार्ग या चार घटकांचा समावेश होतो. मूत्रमार्गातील संसर्गामध्ये यापैकी कोणत्याही भागास संसर्ग होण्याचा संभव असतो. परंतु मूत्रमार्गाचा संसर्ग हा मूत्राशय आणि मूत्रमार्ग या मूत्रप्रणालीतील खालच्या दोन भागांना जास्त होताना दिसतो.

Urine Infection In Male
Frequent Urination: तुम्ही दिवसातून किती वेळा लघवीला जाता? जास्त किंवा कमीवेळा जाणं म्हणजे धोक्याची घंटा

संसर्ग मूत्राशयाला झालेला असेल, तरी तो संपूर्ण शरीरासाठी त्रासदायक होऊन बसतो. पण तो मूत्रपिंडापर्यंत पसरल्यास त्याचा मूत्रप्रणालीवर वाईट परिणाम होतो. बहुतेकदा डॉक्टर्स मूत्रमार्गाचा संसर्ग दूर करण्यासाठी अँटिबायोटिक्सचा वापर करून तो दूर करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर काळजी घेतली तर अशा प्रकारचे संसर्ग टाळता येऊ शकतात.

या संसर्गाची लक्षणे काय आहेत

वारंवार लघवी येणे

पुरुषांमध्ये यूटीआय होण्याचे सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे वारंवार लघवी होणे. जेव्हा पुरुषांना लघवीच्या संसर्गाचा झटका येतो तेव्हा त्यांना पुन्हा पुन्हा लघवी करण्याची इच्छा असते. त्याचबरोबर लघवी करण्यापूर्वी तीव्र दाब येतो आणि लघवी खूप कमी प्रमाणात येते.

पोटाच्या खालच्या भागात दुखणे

जेव्हा पुरुषांना यूटीआय होतो तेव्हा त्यांना खालच्या ओटीपोटात वेदना होऊ शकते. अनेकदा लघवीच्या संसर्गामुळे पाठदुखीची समस्याही उद्भवू शकते. तथापि, ओटीपोटात किंवा कंबरदुखी कधीकधी इतर कारणांमुळे देखील होते. त्यामुळे अशी लक्षणे जाणवल्यास चाचणी करून घ्या.

लघवी करताना तीव्र वेदना आणि जळजळ

जेव्हा पुरुषांना यूटीआयची समस्या असते तेव्हा लघवी करताना तीव्र वेदना आणि चिडचिड जाणवू शकते. अनेकदा वेदना इतक्या वाढतात की त्या व्यक्तीला ताबडतोब डॉक्टरांकडे जावे लागते. जर तुम्हालाही अशी लक्षणे जाणवत असतील तर उशीर न करता चाचणी करून घ्या.

वारंवार लघवी करत असाल तर तपासणी करा
वारंवार लघवी करत असाल तर तपासणी कराesakal
Urine Infection In Male
How Should Men Urinate: पुरुषांनी उभं राहून लघवी का करू नये? जाणून घ्या, एक्सपर्ट काय म्हणतात...

लघवीमध्ये तीव्र वास येतो

लघवी दरम्यान तीव्र वास येणे देखील मूत्र संसर्गाचे लक्षण असू शकते. त्याचबरोबर पुरुषांमध्ये यूटीआयची समस्या असल्यास लघवीचा रंग अधिक पिवळा किंवा तपकिरी असू शकतो. तुम्हालाही अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.

इतर लक्षणे

जेव्हा पुरुषांना लघवीचा संसर्ग होतो तेव्हा थकवा, थंडी, ताप, उलट्या किंवा मळमळ यासारखी लक्षणे देखील दिसू शकतात. जर तुम्हाला लघवी करताना त्रास होण्याबरोबरच अशा समस्या येत असतील तर हे यूटीआयचे लक्षण असू शकते. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Urine Infection In Male
Urine Leakage : शिंकताना, खोकताना अचानक गळते लघवी; काय उपाय कराल ?

दुर्लक्ष करू नका

हे त्रास जाणवू लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग वाढत जाऊन त्रासांमध्ये वृद्धीचं होते. मूत्रमार्गाचा संसर्ग विषाणूंनी मूत्रप्रणालीमध्ये शिरकाव केल्याने होतो. विषाणूंनी मूत्रप्रणालीमध्ये प्रवेश केल्यानंतर उपचार घेईपर्यंत ते वाढत राहतात. आणि रुग्णाला सततच्या वेदनांना सामोर जावे लागते.

युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी पुरुषांनी आपला आहार, दैनंदिन दिनचर्या आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. जर ही समस्या प्रोस्टेटशी संबंधित असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.