तर काय?

माझे वय ५२ वर्षे आहे. गेली २-३ वर्षे जेव्हा जेव्हा लघवीची तपासणी केली तेव्हा तेव्हा पस सेल्स व बॅक्टेरिया असल्याचे आढळले.
Womens
Womenssakal
Updated on

प्रश्र्न १ - माझे वय ५२ वर्षे आहे. गेली २-३ वर्षे जेव्हा जेव्हा लघवीची तपासणी केली तेव्हा तेव्हा पस सेल्स व बॅक्टेरिया असल्याचे आढळले. २-३ वेळा डॉक्टरांनी अँटिबायोटिक्स दिली पण ओटीपोटात अधून मधून दुखत असते. आता पस सेल्स कमी आढळतात. यासाठी काय करता येईल.

- सोनल शहा, पुणे

उत्तर - गेली २-३ वर्षे लघवीचा त्रास होतो आहे, औषधे घेऊनही ओटीपोटात दुखते आहे याचा अर्थ जंतुसंसर्ग पूर्णपणे बरा झालेला नाही. स्त्रियांमध्ये अशा प्रकारे झालेला संसर्ग अनेकदा पूर्णपणे बरा न झाल्याने आत लपून राहतो व त्रास होत राहतो. यासाठी योनीधूपन व योनीपिचू हे उपचार वरचेवर करत राहणे महत्त्वाचे ठरते.

फेमिसॅन तेलाचा पिचू घेण्याने, संतुलन शक्ती धुपाचे धूपन नियमितपणे करण्याने हा त्रास हळू हळू कमी व्हायला मदत मिळेल. तसेच संतुलन यूरिफ्लो गोळ्या, संतुलन पुनर्नवासव घेण्याने शरीरातील दोषांचे संतुलन कमी व्हायला मदत करू शकेल. रोज जिरे व धण्याचे पाणी पिणे हेही आरोग्यासाठी उत्तम ठरू शकेल. आहारातून मटार, वाटाणे, चवळी, छोले, कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, वांगे वगैरे वर्ज्य करणे जास्त बरे.

प्रश्र्न २ - माझे वय २९ वर्षे आहे. माझी मासिक पाळी नियमित आहे. परंतु त्यावेळी पाठ, कंबर, पोट खूप दुखते. दोन दिवस गोळी घेतल्याशिवाय चैन पडत नाही, कामावर जाता येत नाही. झोपून राहावे लागते. यावर उपाय सुचवावा.

- स्वाती किरकिरे, डोंबिवली

उत्तर - पाळीच्या वेळी असह्य दुखणे हे वातदोषाचे लक्षण आहे. वाताच्या शमनासाठी रोज न चुकता संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारखे तेल किंवा संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल पोटावर हलक्या हाताने रोज १-२ वेळा जिरवणे, रोज रात्री फेमिसॅन तेलाचा पिचू योनीभागी ठेवणे फायदेशीर ठरू शकेल. आठवड्यातून १-२ वेळा संतुलन शक्ती धुपाचे धूपन नक्की करावे. एकूणच शरीरातील वातदोष कमी होण्याच्या दृष्टीने आहार वातशामक असावा.

कपभर दूध संतुलन शतानंत कल्प घालून घेणे उत्तम. भात, पोळी यांवर १-२ चमचे साजूक तूप घ्यावे. आठवड्यातून किमान १-२ वेळा घरी बनविलेल्या ताज्या लोण्यात खडीसाखर मिसळून घ्यावे. आहारात मनुका, डिंक, शिंगाड्याची खीर, रव्याची खीर वगैरेंचा समावेश असावा. रोज सकाळी छोटा चमचा कोरफडीचा गर अनाशेपोटी घ्यावा. त्यानंतर संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत घ्यावे.

संतुलन फेमिनाइन बॅलन्स आसव, अशोक-ॲलो सॅन गोळ्या नियमितपणे घेण्याचा फायदा होऊ शकेल. तज्ज्ञांचा सल्ल्यानुसार संतुलन पंचकर्म तसेच उत्तरबस्ती करून घ्यावी. लग्न होऊन मूलबाळ झालेले आहे की नाही हे पत्रावरून समजू शकलेले नाही. परंतु एकूणच स्वतःच्या स्वास्थ्याच्या व गर्भधारणेच्या दृष्टीने या त्रासाकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.