Apple cider vinegar चे फायदे जाणून व्हाल थक्क, वजन आणि Cholesterol होईल झटक्यात कमी

आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी Apple Cider Vinegar चं सेवन उपयुक्त ठरू शकतं. या व्हिनिगरमधील अँटीऑक्टीडंट्स तसचं अॅसिटीक अॅसिडसह अनेक गुणधर्मांचे शरीराला फायदे होतात
अॅपल सायडर व्हिनिगर
अॅपल सायडर व्हिनिगरEsakal
Updated on

अॅपल सायडर व्हिनिगर हा व्हिनिगरचाच एक प्रकार असून यामध्ये सफरचंदाच्या रसावर प्रक्रिया करून हे तयार करण्यात येतं. विविध पदार्थांची चव वाढवण्यासाठी अॅपल सायडर व्हिनिगरचा Vinegar वापर केला जातो. Use Apple cider vinegar for weight loss marathi health tips

विविध सलाड Salad तसंच स्विट डिशसाठी Sweet Dish हे व्हिनिगर वापरण्यात येत. ज्या प्रमाणे अॅपल म्हणजेच सफरचंदाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्याचप्रमाणे अॅपल सायडर व्हिनिगर देखील आरोग्यासाठी Health फायदेशीर आहे. Know about Apple Sider Vinegar benefits for health

आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी Apple Cider Vinegar चं सेवन उपयुक्त ठरू शकतं. या व्हिनिगरमधील अँटीऑक्टीडंट्स तसचं अॅसिटीक अॅसिडसह अनेक गुणधर्मांचे शरीराला फायदे होतात. याज आपण अॅपल सायडर व्हिनिगरचे शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

कधी करावं अॅपल सायडर व्हिनिगरचं सेवन

अॅपल सायडर व्हिनिगरचं सेवन तुम्ही सकाळी नाश्त्यापूर्वी Breakfast करू शकता किंवा जेवणाआधी अर्धा तास करावं. यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा अॅपल सायडर व्हिनिगर टाकून ते प्यावं. या व्हिनिगरचं सेवन कायम पाण्यात मिसळूनच करावं. थेट व्हिनिगरचं सेवन करू नये.

डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर- एका संशोधनानुसार असं आढळून आलं की अॅपल सायडर व्हिनिगरच्या सेवनामुळे ग्लुकोजची पातळी कमी होण्यास मदत होते. तसंच आणखी एका संशोधनानुसार अॅपल सायडर व्हिनिगरमधील मुख्य घटक म्हणजेच अॅसिटीक अॅसिडमध्ये आढळणारे अँटी-डायबिटिक आणि अँटी-ग्लायसेमिक गुणधर्म मधुमेहाची नियंत्रणात राखण्यास मदत करतात.

पचनास मदत- पोटफुगी तसचं गॅस आणि पचनासंबधीच्या सर्व समस्यांसाठी अॅपल सायडर व्हिनिगरचं सेवन उपयुक्त ठरतं. जेवणापूर्वी या व्हिनिगरचं सेवन केल्याने पाचक रस उत्तेजित होण्यास मदत होते. त्यामुळे योग्य पचन होण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

अॅपल सायडर व्हिनिगर
Black Diamond Apple: बाबो! काळ्या रंगाचंही असतं सफरचंद, एकाची किंमत ऐकून व्हाल थक्क

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर- जर तुमचा पोटाचा आणि कंबरेचा घेल वाढत चालला आहे किंवा वजन वाढण्याने तुम्ही चिंतेत आहात. तर अॅपल सायडर व्हिनिगरमुळे तुमचं वजन कमी होऊ शकतं. या व्हिनिगरमधील अॅसिटीक अॅसिडमुळे चरबी कमी होण्यास मदत होते. तसचं अॅपल सायडर व्हिनिगरच्या नियमित सेवनामुळे भूक कमी लागते.

अर्धा चमचा अॅपल सायडर व्हिनिगर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र करून पाण्यासोबत याचं सेवन करावं. सकाळी किंवा जेवणापूर्वी तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. तसचं पोटाची चरबी देखील कमी होईल.

कोलेस्ट्रॉल होईल कमी- कोलेस्ट्रॉल कमी कऱण्यासाठी अॅपल सायडर व्हिनिगरचं सेवन लाभदायक ठरू शकतं. एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार अॅसिटिक अॅसिडमुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड (विविध प्रकारच्या फॅटी ऍसिडचे मिश्रण) कमी होण्यास मदत होते.

तसंच Apple cider vinegar मुळे LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि HDL म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

अॅपल सायडर व्हिनिगर
Benefits of Ice Apple: उन्हाळ्यात ताडगोळा खाण्याचे तुम्हाला फायदे आहेत का?

रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत- या व्हिनिगरच्या सेवनामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं शक्य होईल. या व्हिनिगरमध्ये असलेल्या अॅसिटिक अॅसिडमध्ये अँटी-हायपरटेंसिव म्हणजेच रक्तदाब कमी करणारे गुण आढळतात.

यामुळे योग्य प्रमाणात अॅपल सायडर व्हिनिगरचं सेवन केल्याने रक्तदाब कमी कऱणं शक्य आहे. मात्र त्यांना लो ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी या व्हिनिगरचं सेवन टाळावं.

दातांसाठी उपयुक्त- दात स्वच्छ ठेवण्यासाठी अॅपल सायडर व्हिनिगर उपयुक्त ठरू शकतं. एनसीबीआयच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार दातांवरील पिवळटपणा दूर करण्यासाठी हे व्हिनिगर ब्लिचिंगप्रमाणे काम करतं. मात्र या व्हिनिगरचा अतिवापर दातांसाठी नुकसानदायकही ठरू शकतो. यासाठीच योग्य प्रमाणात वापर कऱणं गरजेचं आहे.

त्वचेच्या समस्या होतील दूर- अॅपल सायडर व्हिनिगरमधील अँटीमायक्रोबियल गुणांमुळे त्वचेवर येणाऱ्या पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते. त्वचेचं बॅक्टेरियल संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी हे व्हिनिगर उपयुक्त ठरतं.

त्वचेसाठी तुम्ही अॅपल सायडर व्हिनिगरचा वापर क्लिंजरप्रमाणे करू शकता. यासाठी अर्धा चमचा व्हिनिगर गुलाबजल किंवा पाण्यामध्ये मिसळावं. यानंतर एक कापसाचा बोळा या मिश्रणात ओला करून चेहरा स्वच्छ करावा.

महिलांसाठी फायदेशीर- अॅपल सायडर व्हिनिगरचे खास करून महिलांसाठी अनेक फायदे आहेत. मासिक पाळीमध्ये महिलांना होणाऱी पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, चिडचिड अशा अनेक समस्या दूर कऱण्यासाठी या व्हिनिगरचं सेवन फायदेशीर ठरतं.

त्याचप्रमाणे तसचं वजायनल इंफेक्शनसाठी देखील अॅपल सायडर व्हिनिगर उपयुक्त ठरत. २ चमचे व्हिनिगर पाण्यामध्ये मिसळून याने प्रायव्हेट पार्ट धुतल्यास इंफेक्शन कमी होण्यास मदत होते.

अशा प्रकारे अॅपल सायडर व्हिनिगरमुळे तुमच्या अनेक समस्या कमी होऊ शकता. अर्थात यासाठी या व्हिनिगरचं योग्य प्रमाणात सेवन करणं गरजेचं आहे. अन्यथा काही दुष्परिणामही जाणवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.