Health Tips : बेडवर पडून फोन पाहणं ठरू शकतं घातक; सवय लवकरात लवकर सोडा

हल्ली फोनची सवय इतकी वाढली आहे की फोनशिवाय वेळच जात नाही.
Mobile Phone
Mobile PhoneSakal
Updated on

बेडवर बसून किंवा झोपण्याच्या आधी फोन पाहण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना असेल. फोनची सवय इतकी वाढली आहे की काही जणांना तर फोनशिवाय झोपच येत नाही. पण अंथरुणावर पडल्या पडल्या फोन पाहणं धोकादायक आहे, याबद्दल तुम्ही जाणून घ्यायलाच हवं.

हल्ली फोनची सवय इतकी वाढली आहे की फोनशिवाय वेळच जात नाही. सकाळ झाल्याझाल्या पहिल्यांदा फोन चेक केला जातो. झोपण्यापूर्वी फोन पाहिला जातो. पण असं करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण यामुळे आरोग्याच्या अनेक धोक्यांना सामोरं जावं लागू शकतं. जेव्हा आपण बराच काळ पडल्या पडल्या फोन पाहतो, तेव्हा आपले हात दीर्घकाळापर्यंत एकाच पोझिशनमध्ये राहतात. आपलं शरीर अशा विचित्र अवस्थेत जास्त काळ राहण्यासाठी योग्य नाही.

Mobile Phone
Heart Health : हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचा धोका पुरूषांपेक्षा महिलांना दुप्पट; संशोधनात धक्कादायक बाब उघड

अशा पद्धतीने तासन तास पडल्याने शरीर विशेषतः मानेवर ताण येऊ शकतो. शिवाय फोनची स्क्रीन पाहण्यासाठी मान सतत पुढे झुकवावी लागते. यामुळे मणक्यावरही ताण येतो. याला टेक्स्ट नेक असंही म्हणतात. हे टाळण्यासाठी मानेला आधार मिळेल अशी उशी वापरावी. त्यामुळे डोकं, मान आणि मणक्याला योग्य अँगल मिळतो. जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल, तर पाठीला आधार देण्यासाठी योग्य उशी वापरा. तुम्ही दोन पायांमध्येही उशी ठेवू शकता. (Health News)

Mobile Phone
Health: आदीवासींचा कल्पवृक्ष आरोग्यासाठीही गुणकारी; मोहाच्या बियांपासून बनविलेल्या तेलाचा आहारात वापर

जेव्हा तुम्ही जास्त काळापर्यंत फोन वापरता तेव्हा स्क्रीनच्या ब्राईटनेसमुळे, डोळे आजूबाजूच्या प्रकाशासोबत जुळवून घेऊ शकत नाहीत. ते करण्यासाठी डोळ्यांना जास्त कष्ट घ्यावे लागतात. अंथरुणात पडून जास्त काळ फोन वापरल्यामुळे डोळे थकतात. त्यामुळे डोळे कोरडे होतात, डोळ्यांमध्ये जळजळ होते, तसंच डोळे लालही होतात. रात्री दीर्घकाळ फोन वापरल्याने झोपेवरही परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.