योग आणि व्यावसायिक नीतिमत्ता

योगा लाइफस्टाईल
pune
punesakal
Updated on

तुमच्यापैकी किती जणांना अतिरिक्त पैसा कमाविण्याचा किंवा कर वाचवायचा मोह आहे? अर्थात पैसा कमवण्याचे कोणतेही मार्ग शेवटपर्यंत योगिक असत नाहीत व त्यामुळेच हा फरक पडतो. योगाच्या मार्गाने व्यवसाय केल्यास तुमच्या बुद्धिमत्तेचा उपयोग पैसा कमविण्यासाठी करणे आहे.

त्याचबरोबर तुमच्यातील बुद्धिमत्तेचा वापर इतरांचे जीवनमान उंचावण्यासाठीही करता येते. तुमची उत्पादने, तुम्ही देत असलेली सेवा लोकांच्या उद्दिष्टाजवळ जाणारी, त्यांच्यातील आंतरिक सत्याला, आत्मिक समाधानाला मदत करणारी ठरते. त्याचबरोबर तुमच्या असण्याने (उपस्थितीने) त्यांना प्रगतीसाठी काही पावले चालण्यासाठी मदत होत असेल, तेव्हा तुमच्या त्या प्रयत्नांच्या बदल्यात मिळणारे धन (पैसा) पवित्र असते. विशेष म्हणजे, तुम्ही स्वच्छ विचाराने, हेतूने सेवा करता, त्यावेळी तुम्हाला आवश्यक असलेले धन समाजाकडून भरभरून प्रमाणात प्राप्त होते. यातील गमतीचा भाग असा की, तुम्ही या मानसिकतेतून सेवा करता, तेव्हा तुम्हाला स्वतःसाठी खूप कमी हवे असते. इतरांना अधिकाधिक चांगली सेवा कशी देता येतील, याचाच तुम्ही सातत्याने विचार करत असता. मात्र, सध्याच्या काळात जलद आणि सोप्या आणि अनैतिक मार्गाने पैसे कमावणे, ग्राहकांची काळजी न घेणे, कर न भरणे याचे प्रमाण अधिक आहे.

‘स्वतःच्या विचारांवर ताबा आणि शुद्धता जपणारी शहाणी व्यक्ती आत्म्याच्या पातळीवर निर्माण झालेल्या वादळांवर नियंत्रण ठेऊ शकते,’ असे विचारवंत जेम्स अॅलेन यांनी म्हटले आहे. वरील विचार खूप काही सांगत आहे. तुम्हाला खरेच बलशाली व्हायचे असल्यास आधी विचारशुद्धी असणे आवश्यक आहे. या शुद्ध केलेल्या (असलेल्या) विचारांमधून तुमच्या व्यवसायाच्या कल्पना, प्रत्यक्ष कृतीद्वारे होत असलेली मानवतेची सेवा अत्यंत प्रभावशाली होते. महत्त्वाची बाब कायम लक्षात ठेवावी, ती म्हणजे अशुद्ध मनाने केलेला व्यवसाय आणि त्यातून मिळालेला पैसा यांमुळे तुम्ही झोप, मानसिक शांतता आणि पर्यायाने आरोग्यही गमावता. हे दुर्दैवी, मात्र सत्य आहे. चला तर मग, व्यवसायाला लागू होणारे योगाचे मूलभूत सिद्धांत लक्षात घेऊयात...

अहिंसा : कार्यालयात काही अहिंसक घटना घडत आहेत का ते तपासा, म्हणजे राजकारण, अन्यायकारक पद्धती, कामाचे श्रेय न देणे किंवा महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन, या सर्वांचा शोध घ्या. याशिवाय तुमच्या व्यावसायिक कल्पनांमध्ये प्राणी हत्या, वृक्षतोड अथवा लोकांना अमली पदार्थ, अल्कोहोल, सिगारेट यांबद्दलची संवेदना बोथट होईल, अशा वस्तुंचे उत्पादन करत नाही ना, याचाही शोध घ्या. ही नमुन्यादाखल दिलेली उदाहरणे आहेत.

सत्य : व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांशी, पुरवठादारांशी किंवा अगदी स्वतःशी खोटे बोलण्यास प्रवृत्त होत असल्यास तुम्ही व्यवसायात योगापासून खूर दूर आहात.

असत्य : दुसऱ्यांच्या कल्पना, न केलेल्या कामाचे श्रेय, पैसा आणि सामान्य नागरिकांची मनःशांती हिरावून घेत असल्यास तुमच्या व्यवसायात योगाचा लवलेशही नसतो.

अपरिग्रह : पैसा साठवून ठेवायला कोणाला आवडत नाही? मात्र, तुम्ही व्यवसायात उत्पादनाची साठेबाजी करता, वाढलेली किंमत, पैशांची साठेबाजी करता ते योग्य नाही. त्यातून गमाविण्याचीच भीतीच अधिक निर्माण होते. प्रचंड मालमत्ता, बँकेत शिल्लक असणे चांगले आहे, परंतु त्याच्या संरक्षणाची जोखीम असते. त्याची काळजी घेण्यासाठी योग्य व्यक्तींचा शोध घेण्यासाठीही मनावर दबाव असतो. त्यामुळे तणाव निर्माण होऊन काहीतरी अघटित घडू शकते. अशा परिस्थितीत स्वतःमध्ये डोकावून पाहण्यासाठी किंवा योगासाठी कधीच वेळ मिळणार नाही. म्हणूनच समंजस व्यक्ती आपल्याला आवश्यक तेवढेच साठविण्याचा आणि उर्वरित सोडून देण्याचा सल्ला कायम देत असते.

ब्रह्मचर्य : व्यवसायामुळे तुमच्यातील पाच संवेदनांवरील नियंत्रण गमावले जात असेल किंवा इतरांनाही तसे करण्यास भाग पाडत जात असेल तर ते तुमच्यासाठी आणि समाजासाठी घातक आहे. तुम्ही आज विक्री केलेल्या उत्पादनांतून तुमच्या संवेदना प्रसन्न व्हाव्यात. मग ते अन्न, कार, घड्याळे, पिशव्या, बूट, घरे, गॅजेटस् असे काहीही असो. ते आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी असावे. त्यातून लोभ, भावनिक गुंतवणूक किंवा मत्सर निर्माण होऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.