Vertigo Causes : चक्कर येणे किंवा अचानक डोकं गरगरले की आपण घाबरतो. मात्र तर ही एक शारीरिक कमजोरीचे लक्षण आहे. यालाच वैद्यकीय भाषेत ‘व्हर्टिगो’ म्हणतात. हा एक शारीरिक संतुलनाशी संबंधित आजार आहे. सामान्यत: आतील कानाच्या समस्यांमुळे होतो. या त्रासामुळे अचानक असह्य वेदना होतात. जग फिरत आहे असे वाटते. या आजारामुळे शरीराच्या वेस्टिब्युलर प्रणालीत अडथळा निर्माण होतो. चालताना पडले की, फ्रक्चरचा धोका असतो, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
‘व्हर्टिगो’ एक आजार सामान्य आहे, जगभरातील १० पैकी एकाला हा आजार होतो. भारतात ‘व्हर्टिगो’चा ९ दशलक्षपेक्षा अधिक व्यक्तींना त्रास आहे. महिलांमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण आहे. तरीही समाजात अजूनही याबाबत फारशी जागरूकता नाही. त्यामुळे अनेकांना वेळीच हा आजार कळत नाही. ‘व्हर्टिगो’वर फिजिओ थेरपी, आहारातील बदल आणि जीवनशैलीत बदल, औषधोपचार, मानसोपचार किंवा काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया करून उपचार केले जाऊ शकतात, असे कान नाक घसारोग तज्ज्ञ डॉ. कांचन तडके यांनी सांगितले.
६० वर्षे वयाचे व्यक्ती - ४० टक्के
८५ वर्षांच्या व्यक्तींना -५० टक्के
लक्षणे अशी
कानात गुणगुण आवाज येणे
ऐकू न येणे
भोवळ येताना मळमळ होणे
चालताना पडणे
श्वसन प्रक्रियेत हदयाच्या ठोक्यात बदल होणे
घाम येणे, दुहेरी दिसणे
डोळ्यांच्या असामान्य हालचाली होणे
बोलताना अडचणी येणे
चेहऱ्याचा पक्षघात होणे
हातापायात अशक्तपणा येणे
मधुमेह मिलिटस
अस्थेरोस्क्लेरॉसिस
न्यूरॉजिकल विकृती
औषधांचे अतिसेवन
डोक्याला इजा
स्ट्रोक
कानाच्या आतील भागास सूज येणे
कानाच्या आतील बाजुला छिद्र होण
डोक्याची टोमोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय
डोळ्यांच्या हालचाली मोजण्यासाठी इलेक्ट्रोनिस्टागमोग्राफी
रक्त चाचणी आणि मेंदूच्या विद्युत लहरी मोजण्यासाठी ‘इईजी’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.