व्हिडिओ गेम्सचा विळखा

व्हिडिओ/ कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनात अडकलेल्या समरची ही कथा आहे. समर माझ्या मित्राचा मुलगा, दहावीत मेरीटमध्ये आलेला.
Video Game
Video Gamesakal
Updated on

तो विलक्षण भारल्यासारखा त्या खेळात बुडाला होता. जणू काही जीवन-मरणाचा प्रश्न होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. कधी त्वेष, कधी भीतीदायक गोठल्यासारखा थंडपणा, कधी विजयोन्माद, कधी विलक्षण हताश. त्याला आजूबाजूच्या जगाचं भान नव्हतं. तो फक्त त्याच्याच त्या कृत्रिम वास्तवात होता. त्याला खऱ्या वास्तवापासून जितकं लांब पळता येईल तेवढं पळायचं होतं.

व्हिडिओ/ कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनात अडकलेल्या समरची ही कथा आहे. समर माझ्या मित्राचा मुलगा, दहावीत मेरीटमध्ये आलेला. अकरावीत आल्यापासून अभ्यास, क्लासमधलं लक्ष उडालेला. शांत, अबोल, वरकरणी समजूतदार वाटणारा; पण आता आई-वडिलांनी कितीही समजावलं, रागावलं तरीही गेम्स खेळणं थांबवू न शकणारा. गेम्सच्या मायावी काल्पनिक विश्वात अडकलेला. जे विश्व त्याला खोट्या आभासी ताकदीचा फील देतं. त्याला एकीकडे ठाऊक आहे हे सगळं खोटं आहे; पण त्यातली नशा त्याला पुनःपुन्हा खेळण्यासाठी प्रवृत्त करते.

Addiction is the only prison where the locks are on the inside. व्हिडिओ गेम्सच्या व्यसनाच्या बाबतीत हेच म्हणता येईल.

आज व्हिडिओ/ कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनात अनेक मुलं अडकली आहेत, अडकत आहेत. मुलांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर- पर्यायानं त्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम घडवू शकणारं हे व्यसन आहे. या मुलांच्याबाबतीत आतून म्हणजे त्यांची थिंकिंग प्रोसेस बदलूनच त्यांना यातून सोडवता येईल. टेक्नॉलॉजीचा योग्य उपयोग नाही झाला, तर अल्बर्ट आइन्स्टाइनचं quote खरं ठरेल, ‘It has become appallingly obvious that our Technology has exceeded our Humanity’, अन् त्याचे दुष्परिणाम भोगायला लागतील.

साधारणपणे टीनएजर्स असताना व्हिडिओ/ कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनाची सुरुवात झालेली आढळते. साधारण अकरावीत आल्यापासून अभ्यास, क्लासमधलं लक्ष उडतं. बरीच मुलं शांत, अबोल, वरकरणी समजूतदार वाटणारी असतात; पण कितीही समजावलं, रागावलं तरीही गेम्स खेळणं थांबवू शकत नाहीत.

त्यामुळे अभ्यासातली एकाग्रता नाहीशी झालीय, मन:शांती हरवलीय, एकटेपणा जाणवतोय, झोपेचं, जेवणाखाण्याचं गणित बिघडून गेलंय. मेरीटमध्ये येण्याची शक्यता असलेला मुलगा नापास होतोय. आई-वडील अस्वस्थ झालेत.

हीच गोष्ट अनेकांची झालीय. यातली बरीच मुलं शाळेला, कॉलेजला, क्लासला दांड्या मारतात. जेवणाखाण्याकडे लक्ष नाही.

घरच्यांशी संवाद तुटत चाललाय. खोटं बोलण्याचं प्रमाण वाढलंय. रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. इंटरनेट काढून टाकलं, तर मोबाईल, नाहीतर सायबर कॅफे चालू. अस्वस्थतेच्या आजाराचे बळी बनत चाललेत. काहीजणांना पटकन् व खूप राग येतो. खोटं बोलतात. बाहेर पैसे खर्च करण्याचं प्रमाण वाढलंय.

गेम्स आणि व्यसन

दोन प्रकारचे व्हिडिओ गेम्स असतात. म्हणूनच दोन प्रकारची addictions असतात. एका प्रकारात एकजण पूर्ण गेम खेळू शकतो. उदा. प्रिन्सेसची सुटका वगैरे. म्हणजेच तिथं उद्दिष्ट स्वच्छ असतं. दुसऱ्या प्रकारच्या गेम्समधे एकापेक्षा जास्त संख्येने खेळाडू असतात. हे गेम्स online असतात. म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी बसून लोक हे खेळ खेळतात. या गेम्सना बहुधा ठरलेला शेवट नसतो.

त्या क्षणी जो पुढे असेल तो सर्वश्रेष्ठ असं मानलं जातं अन् हेच विजेतेपद क्षणासाठी का होईना विजेत्याला बेभान करतं. आजूबाजूचं वास्तव विसरलं जातं. माणूस त्या आभासी जगात स्वत:ला गुंतवून टाकतो. या पद्धतीच्या गेम्सचं addiction जास्त प्रमाणात आढळतं.

हे addiction निर्माण होण्यामागे ज्या पद्धतीने हे गेम्स डिझाईन केले जातात तेही कारणीभूत ठरतं. या गेम्समध्ये अत्यंत आकर्षक रंगसंगतीबरोबरच पात्रांचे (characters) आकार व वागण्याची पद्धत, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव असे असतात, की तुम्ही त्यात गुंतून जावं. गेम्समधील challenge आणि उत्कंठा इतपतच ठेवली जाते, की आपण जिंकू शकू असं खेळणाऱ्याला वाटावं; पण उद्दिष्ट अशक्य वाटू नये आणि त्यानं गेम सोडून जाऊ नये.

या गेम्सचं आकर्षण आणि disorder हे जवळजवळ gambling सारखंच आहे. हे गेम्स खेळत असताना, वाढणारी मेंदूतील endorphin आणि इतर रासायनिक द्रव्यं सुखाचा, धुंदीचा फील देत राहतात. मग उन्माद वाटायला लागतो. त्याची सवय लागली, की खेळत नसतानाही त्याच्या स्मृती सुखावत राहतात.

या व्यसनाचे परिणाम आणि उपाय पुढच्या भागात बघू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.