हेल्थ वेल्थ : अन्नाचे ‘व्यसन’ खरेच असते का?

बर्गर, पिझ्झा, बिर्याणी, आइस्क्रीम, गुलाबजाम! तोंडाला पाणी सुटले ना? काही वेळा, तुमचे पोट भरलेले असते तरीही तुम्ही स्वतःला हे पदार्थ खाण्यापासून रोखू शकत नाही.
Food Addiction
Food AddictionSakal
Updated on
Summary

बर्गर, पिझ्झा, बिर्याणी, आइस्क्रीम, गुलाबजाम! तोंडाला पाणी सुटले ना? काही वेळा, तुमचे पोट भरलेले असते तरीही तुम्ही स्वतःला हे पदार्थ खाण्यापासून रोखू शकत नाही.

- विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप

बर्गर, पिझ्झा, बिर्याणी, आइस्क्रीम, गुलाबजाम! तोंडाला पाणी सुटले ना? काही वेळा, तुमचे पोट भरलेले असते तरीही तुम्ही स्वतःला हे पदार्थ खाण्यापासून रोखू शकत नाही. परंतु याला आता व्यसन म्हणता येईल का? आणि मुळात अन्नाचे व्यसन खरेच लागते का?

आपण काहीतरी स्वादिष्ट आणि चवदार खातो, आपल्याला ते आवडते, चांगले वाटते आणि आपल्याला असेच चांगले वाटत राहावे अशी इच्छा असते, म्हणून आपण ते पुन्हा पुन्हा खातो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, आपण चांगल्या भावना चांगल्या अन्नाशी जोडतो. हेच आपल्याला हवे आहे. आणि ती वाईट गोष्ट नाही. पण जेव्हा आपण खाल्लेल्या अन्नाचे प्रमाण वाढते तेव्हा तो चिंतेचा विषय बनतो.

आपण अन्न कमी करण्याचे काही कारण आहे का? अभ्यास दर्शवतो, की अन्नामध्ये कोपिंग मेकॅनिझम बनण्याची क्षमता आहे. कामावर असताना एक दिवस वाईट गेलाय म्हणून निराश आहात? की आज बसमध्ये सहप्रवाशासोबत भांडण? क्षुल्लक मुद्द्यावर मित्राशी वाद? अन्न, नेहमी, तुमच्यासाठी हजर आहे.

तथापि, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की जास्त प्रमाणात अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा, रक्तदाब समस्या, मधुमेह, पचनसमस्या आणि हृदयाच्या समस्या हे सारे अन्नाच्या अतिसेवनाच्या नकारात्मक परिणामांचा केवळ वरवर दिसणारा भाग आहे.

आपण या समस्येचा कसा सामना करू शकतो? आता काही पद्धती फार वर्षांपासून असल्या, तरी आपण त्यांना आधुनिक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.

परिस्थिती ओळखा आणि स्वीकारा

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परिस्थिती ओळखणे आणि मान्य करणे की तुम्हाला अन्नाचे व्यसन आहे, त्यात काही कमीपणा वाटण्यासारखे नाही. तुम्हाला समस्या आहे हे मान्य करणे ही परिस्थितीचे गंभीरपणे विश्लेषण करण्याची आणि त्यावर उपाय शोधण्याची पहिली पायरी आहे.

स्वतःशी करार करा

परिणामांची यादी एका कागदावर उतरवा आणि नंतर तुमच्या समस्येचे निराकरणदेखील लिहा. तुम्ही खाऊ शकता असे पदार्थ आणि तुम्ही टाळावे अशा पदार्थांची तुम्ही यादीदेखील तयार करून ठेवू शकता. त्याला मनोरंजक बनवण्यासाठी एक पर्याय म्हणजे प्रत्येक टप्पा गाठल्यावर बक्षिस आणि अयशस्वी झाल्यास शिक्षा. तुम्ही नेहमी जिंकता हे सुनिश्चित करण्याचा एक मार्ग म्हणजे स्वतःशी स्पर्धा करणे. याव्यतिरिक्त, एकदा तुम्ही ते कागदावर उतरवले की, त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आणि बदलणे अशक्य होते.

अन्नाची जागा व्यायामाला द्या

नियमित व्यायाम केल्याने अर्थातच तुमचे आरोग्य चांगले राहील. पण याचा अर्थ असा नाही, की तुम्ही फक्त व्यायाम करता म्हणून एक टन जेवाल. चला तर मग याला विविध पर्यायांसह आधुनिक टच देऊया.स्वतःला सांगा, की प्रत्येक वेळी तुम्हाला जास्त खाणे किंवा बिंज इटिंग करावेसे वाटेल, तेव्हा तुमचे मन साफ करण्यासाठी तुम्हाला फक्त ३० मिनिटे चालायचे आहे. आणि जर तुम्ही चालण्याकडे दुर्लक्ष केले आणि तुम्ही खाण्याकडे वळलात, तर तुम्हाला त्याऐवजी ३० मिनिटे धावावे लागेल. ज्या क्षणी तुमच्याकडे एका पेक्षा दुसरा अवघड पर्याय असेल, तेव्हा तुमचे मन कठीण कृती टाळण्यास तुम्हाला प्रवृत्त करेल.

अल्कोहोल असलेली पेये टाळा

अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर प्रभाव पाडण्याची आणि तुम्हाला प्रभावित करण्याची क्षमता असते. अल्कोहोलच्या प्रभावाखाली तुम्ही निवडलेले अन्न हेदेखील तुम्ही त्या वेळी घेतलेल्या निर्णयाइतकेच वाईट असते. इतकेच नाही तर मद्यपान केल्याने तुम्हाला भूक लागते. पण तुम्ही असे ठरवून दारू टाळू शकत नाही, बरोबर?

अशा वेळी कदाचित मन दुसऱ्या गोष्टीवर नेले तर ते कार्य करेल. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला मद्यपान करण्याची इच्छा होते तेव्हा स्वतःला अशा परिस्थितीत ठेवा. जेथे अल्कोहोलचे सेवन सहज टाळले जाऊ शकेल. एक छंद किंवा एखादा खेळ खेळणे जिथे तुम्हाला तुमचे सर्व लक्ष आणि एकाग्रतेची गरज आहे असे काहीतरी उत्तम काम करेल.

मनाला जे हवे आहे ते द्या

जेवणाचे व्यसन सोडणे लगेच अशक्य आहे. फक्त तुमच्या मनाला आरामदायी अन्न आहे ते हवे आहे म्हणून ते पदार्थ खाण्याचा आग्रह धरू नका. मनाला हवे ते अन्न नक्कीच द्या, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. स्वत:ला अस्वास्थ्यकर अन्न देण्याऐवजी आरोग्यदायी पर्यायांची निवड करा. भाजलेले हरभरे हे साधारण सर्वांना आवडतात आणि त्याचा सहसा कंटाळा येत नाही. काही भारतीय मसाले असलेले कॉर्न हा दुसरा पर्याय आहे.

जाणकारांची मदत घ्या

जास्त खाणे किंवा बिंज इटिंग ही एक समस्या आहे ज्याला संबोधित करणे आणि हाताळणे आवश्यक आहे असे बहुतेकांना वाटत नाही. आपल्याला भेडसावणाऱ्या आपल्या इतर समस्यांच्या तुलनेने ही सर्वांत कमी महत्वाची असू शकते. काहींना, अति खाणे किंवा अन्नाचे व्यसन ही समस्या आहे हेच मंजूर नसेल. परंतु ही एक गंभीर समस्या आहे आणि जर ती खूप गंभीर झाली तर, पोषणतज्ज्ञ किंवा आहारतज्ज्ञ यांच्याकडून व्यावसायिक मदत घेणे हा गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य मार्ग असतो.

शेवटी, हे सर्व आपल्या वैयक्तिक इच्छाशक्तीवर आणि स्वतःला नाही म्हणण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. जास्त, अस्वास्थ्यकर अन्नापासून दूर राहिल्याने आपल्याला निरोगी आरोग्याच्या जवळ जाता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.