हेल्थ वेल्थ : औषधी गुणधर्माचे स्वयंपाकघरातील मसाले

आपले स्वयंपाकघर अनेक मसाले आणि पावडर यांनी भरलेले असतात. हे स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी वापरले जात असले तरी ते अनेक आजारांवर उपचार करू शकतात.
Masale
MasaleSakal
Updated on

- विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप

आपले स्वयंपाकघर अनेक मसाले आणि पावडर यांनी भरलेले असतात. हे स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी वापरले जात असले तरी ते अनेक आजारांवर उपचार करू शकतात. जवळजवळ सर्व प्रकारच्या वेदना आणि आजारांवर उपचार करण्यासाठी स्वयंपाकघरातील घटकांपासून बनवलेले ‘आज्जीचा बटवा’ आठवतो? औषधाची गोळी खाण्यापेक्षा हे घरचे उपाय शोधण्यासाठी आपण त्यापैकी काहींची पुन्हा भेट घेतली तर?

दालचिनी -

अभ्यासातून असे दिसून आले आहे की दालचिनीमध्ये रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्याची क्षमता असते, याचा अर्थ असा आहे की मधुमेह असलेल्या लोकांना दालचिनीच्या सेवनाने फायदा होऊ शकतो. दालचिनीचा वापर मधुमेहावरील औषधांच्या ऐवजी किंवा त्या औषधांना पर्याय म्हणून केला जाऊ शकत नाही, परंतु ते निश्चितपणे अतिरिक्त उपाय म्हणून वापरले जाऊ शकते. दालचिनीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात आणि ते पोटदुखीपासून मुक्त होण्यास मदत करतात.

हळद -

हळद आणि उत्तम त्वचा हे एक साथ जातात. लग्नाआधी होणाऱ्या हळदी समारंभांना आपण सर्वजण गेलो आहोत. हळदीची पेस्ट चांगल्या त्वचेसाठी एक उत्तम मूल्यवर्धक आहे. त्वचेचा उजळपणा वाढवण्यास हळद मदत करते आणि त्वचेवरील कोणतेही बॅक्टेरिया साफ करण्यासाठी अँटीबॅक्टिरियल एजंट म्हणून देखील कार्य करते. हळद जंतुनाशक आहे, वेदना कमी करते आणि रक्तस्राव थांबविण्यासाठी आणि संक्रमण मुक्त ठेवण्यासाठी रक्तस्राव झालेल्या जखमेवर लावता येते.

आले आणि लसूण -

मधासह आले सर्दी आणि खोकला नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. सर्दी किंवा खोकला होणार आहे, असे वाटल्यास सुरूवातीलाच याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. लसणात अँटिफंगल गुणधर्म आहे, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे आणि आपल्याला अधिक हट्टी जीवाणूंविरूद्ध देखील मदत करतो. हे देखील समजले जाते की लसूण वजन कमी करणारा एजंट म्हणून काम करू शकते आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करू शकते.

कढीपत्ता -

कढीपत्ता आपल्या केसांचे आणि टाळूचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि वाढण्याचे काम करते. भाजीत फोडणीत घालण्याव्यतिरिक्त, हे अतिसारास प्रतिबंध करतात तसेच बद्धकोष्ठते पासून मुक्तता देण्यात ही मदत करतात. तसेच, आपण अजून एक गोष्ट खूप वेळा ऐकली आहे.

ती म्हणजे चांगल्या दृष्टीसाठी गाजर खावे? बरं, गाजरात आढळणारे जीवनसत्त्व ‘अ’ कढीपत्त्यातही असते. त्यामुळे कढीपत्ता खाल्ल्याने तुमची दृष्टीही सुरक्षित राहते. एकंदरीत, भारताला मसाल्यांची भूमी म्हटले जाते आणि त्यातले बरेचसे मसाले आपण आपल्या स्वयंपाकघरात पाहू शकतो. त्यामुळे आपल्याला या घटकांबद्दल माहिती असणे आणि आरोग्याच्या दृष्टीने त्याचा कसा फायदा करून घेता येईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.