विराट कोहली करतोय ‘बॅक एक्सटेंशन’; व्हिडिओ नक्की पाहा

विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी कठोर मेहनत घेत आहेत.
Virat Kohali
Virat Kohaliesakal
Updated on
Summary

विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी कठोर मेहनत घेत आहेत.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी विराट कोहलीने एक प्रेरणादायी व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो जिममध्ये ‘बॅक एक्सटेंशन’ करताना दिसत आहे. या व्यायामाच्या माध्यमातून तो आपले कोअर मसल्स ट्रेन करत आहे. टीममध्ये नसतानाही तो किती मेहनत घेतोय, हेच या व्हिडिओवरून लक्षात येते.

Virat Kohali
मलायका ते विराट कोहली.. हे सेलिब्रिटी पितात 'ब्लॅक वॉटर'

टी-२० वर्ल्डकपनंतर न्युझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कोहलीला विश्रांती दिली गेली. आता ३ ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार्‍या न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन करण्यासाठी विराट कोहली सज्ज झाला आहे. या मॅचपूर्वी तो शरीराला टोनिंग करताना आणि किलर कोअर वर्कआउट करताना दिसला. जिममध्ये व्यायाम करतानाचा एक प्रेरणादायी फिटनेस व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो बॅक एक्सटेंशनच्या माध्यमातून पाठीचे आणि पोटाचे स्नायू मजबूत करताना दिसत आहे.

Virat Kohali
HBD Virat : क्रिकेटर विराटची थक्क करणारी ब्रँड व्हॅल्यू

बॅक एक्सटेंशनचे फायदे:

बॅक एक्सटेंशनच्या माध्यमातून कोअर मसल्स मजबूत होतात. त्यामुळे दैनंदिन क्रीया आणि खेळ सहजतेने पार पाडण्याबरोबरच मानसिक संतुलन आणि स्थिरता सुधारण्यास मदत होते. याशिवाय दुखापतींपासून संरक्षण होते. पाठीचा कणा आणि श्रेणी स्थिर ठेवण्यासाठी कोअर स्नायूंचा व्यायाम महत्ताची भूमिका बजावतो. म्हणूनच तुमच्या ओटीपोट, पाठीचा खालचा भाग, नितंब आणि पोटाच्या स्नायूंना ट्रेन करण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोर वर्कआउट करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.