रोज फक्त 10 मिनिटं जास्त चालल्यास वाढू शकते तुमचे आयुष्य

 Walk
Walk
Updated on
Summary

वयोवृध्दांनी १० मिनिटे जास्त अ‍ॅक्टिव्हिटी केल्यास मृत्यूची ७ टक्के शक्यता कमी करतो

दरम्यान, दररोज 20 आणि 30-मिनिटे अ‍ॅक्टिव्हिटी केल्यास दर 13% आणि 17% कमी होऊ शकतो

तज्ज्ञांच्या मते, गटासाठी अधिक व्यायाम संभाव्य मृत्यू कमी करण्यासाठी फायेदशीर ठरू शकतो.

''दररोज दहा मिनिटे जास्त चालण्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक वर्षे वाढवू शकतात,'' असे संशोधकांना आढळले आहे. 5,000 मध्यमवयीन आणि वृद्ध अमेरिकन लोक या संशोधनामध्ये सहभागी होते. अभ्यासात असे दिसून आले की, ''व्यायामाची पातळी वाढल्याने कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी झाला.''

दररोज फक्त 10 मिनिटे जास्त मॉडेरट अ‍ॅक्टिव्हिटी जसे की, भरभर चालणे 40 ते 85 वर्षे वयोगटातील मृत्यू वार्षिक सात टक्क्यांनी कमी करतात.

संशोधकांचा अंदाज आहे की, ''जीवनशैलीतील लहान बदलामुळे यूएसमध्ये दरवर्षी 100,000 जीव वाचू शकतात.''

 Walk
कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनपेक्षा अधिक वेगाने पसरणार

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अभ्यासानुसार, दररोज 20 मिनिटे किंवा 30 मिनिटांनी व्यायाम वाढवल्यास मृत्यूचे प्रमाण अनुक्रमे 13 आणि 17 टक्क्यांनी कमी होईल.

ब्रिटनमध्ये प्रत्येक आठवड्यात 150 मिनिटे मध्यम शारीरिक व्यायाम (moderate physical exercise)पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो, जसे की सायकल चालवणे.

प्रमुख लेखक डॉ पेड्रो सेंट-मॉरिस म्हणाले की, निष्कर्ष वृद्ध प्रौढांना त्यांची अ‍ॅक्टिव्हिटी वाढवण्यास प्रोत्साहित करतात.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी असा अंदाज लावला आहे की, दररोज 10 मिनिटांनी शारीरिक हालचाली वाढवल्यास यूएसमध्ये दरवर्षी 111,174 मृत्यू टाळता येतील (6.9 टक्के). 20-मिनिटांच्या वाढीमुळे देशातील मृत्यूची संख्या प्रति वर्ष 209,459 ने कमी होईल (13 टक्के), तर 30-मिनिटांच्या वाढीमुळे मृत्यूच्या दरामध्ये 272,297 घसरण होईल (16.9 टक्के)

 Walk
शॅम्पूची बाटली तुम्हाला बनवू शकते लठ्ठ; संशोधनाचा निष्कर्ष

मी किती व्यायाम करावा? (HOW MUCH EXERCISE SHOULD I DO?)

19 ते 64 वयोगटातील प्रौढांना दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

NHS म्हणते की ब्रिटनमधील लोकांनी आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेची (moderate intensity) किंवा आठवड्यातून 75 मिनिटे जोरदार तीव्रतेची (vigorous intensity) अ‍ॅक्टिव्हिटी करावी.

अपंग प्रौढ, गरोदर स्त्रिया आणि नुकत्याच आई झालेल्या महिलांसाठी देखील समान सल्ला दिला आहे.

आठवड्यातून फक्त एक किंवा दोनदा व्यायाम केल्यास हृदयरोग(heart diseas) किंवा पक्षाघाताचा(stroke)धोका कमी होतो.

मध्यम तीव्रतेच्या हालचालींमध्ये भरभर चालणे, वॉटर एरोबिक्स, सायकल चालवणे, नाचणे, डबल टेनिस, ट्रेकिंग आणि रोलरब्लेडिंग यांचा समावेश होतो.

जोरदार तीव्रतेच्या हालचालींमध्ये धावणे, पोहणे, वेगात सायकल चालवणे किंवा टेकडीवर सायकल चालवणे, पायऱ्या चढ उतर करणे तसेच फुटबॉल. रग्बी, नेटबॉल, हॉकी सारखे खेळ खेळणे.'

'आमच्या माहितीनुसार, अ‍ॅक्टिव्हिटी वाढवणे प्रत्येकासाठी शक्य नाही याची अंदाज असताही यूएसमध्ये प्रौढांमध्ये एक्सीलरोमीटर-आधारित मोजमाप वापरून शारीरिक हालचालींद्वारे टाळता येण्याजोग्या मृत्यूंच्या संख्येचा अंदाज लावणारा हा पहिला अभ्यास आहे,'' ते म्हणाले.

 Walk
आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवस सुटी; हे नियम खरंच फायदेशीर ठरू शकतात का? जाणून घ्या

संशोधकांनी राष्ट्रीय डेटाबेसमधून एकत्रित केलेल्या 40 ते 85 वयोगटातील 4,840 सहभागींचा मृत्यू दर आणि आरोग्य नोंदी तपासल्या, हे शोधण्यासाठी की त्यांच्या हलाचालीच्या पातळीत थोड्या प्रमाणात वाढ झाल्याने मृत्यू टाळणे शक्य आहे का?

यासाठी एका आठवड्यासाठी एक्सेलेरोमीटर (व्यक्ती किती सक्रिय आहेत याचे मुल्यामापण करणारे उपकरण) वापरणाऱ्या volunteers कडून गोळा केलेल्या डेटावर आधारित मध्यम-ते-जोरदार तीव्रतेच्या शारीरिक हालचालीचे मुल्यमापन केले.

जामा इंटर्नल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या अंदाजानुसार, दररोज 10 मिनिटांनी शारीरिक हालचाली वाढविल्यास यूएस लोकसंख्येमपैकी दरवर्षी 111,174 मृत्यू टाळता येतील (6.9 टक्के).

20 मिनिटांच्या वाढीमुळे देशातील मृत्यूची संख्या प्रति वर्ष 209,459 (13 टक्के) कमी होऊ शकते, तर 30-मिनिटांच्या वाढीमुळे मृत्यूच्या दरामध्ये 272,297 घसरण (16.9 टक्के) होईल.

ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स डेथ डेटानुसार,''युकेमध्ये,10 मिनिटे अधिक व्यायामामुळे सुमारे 10,000 कमी मृत्यू होतील''

अभ्यासानुसार, पुरुषांना व्यायामाच्या वाढीचा सर्वाधिक फायदा होईल. दररोज 10 मिनिटे अधिक अ‍ॅक्टिव्हिटी केल्याने पुरुषांच्या एकूण मृत्यूंपैकी 8 टक्के घट होईल, तर स्त्रियांमधील मृत्यूचे प्रमाण 5.9 टक्क्यांनी कमी होईल.

याव्यतिरिक्त, गौरवर्णीय लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण 7.3 टक्के, मेक्सिकन अमेरिकन लोकांमध्ये 4.8 टक्के आणि नॉन-हिस्पॅनिक कृष्णवर्णीय लोकांमध्ये 6.1 टक्के कमी होईल, असे संशोधकांना आढळले आहे.

शारीरिक हालचालींमध्ये वाढ होण्याचे आकडे, घटक प्रत्येकासाठी शक्य होणार नाहीत, जसे की नाजूक समजले जाणारे किंवा ज्यांना चालण्यासाठी उपकरणे आवश्यक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.