Health Care : ॲलर्जीपासून दूर राहायचंय? मग, आवडीच्या पदार्थांना करा बाय बाय..!

Health Care : काही व्यक्तींना विशिष्ट वातावरणात वेगवेगळ्या प्रकारचा त्रास जाणवू लागतो. शिंका येणे, डोळे लाल होणे, डोळे खाजणे, नाक वाहने इत्यादी.
Health Care
Health Care esakal
Updated on

Health Care : काही व्यक्तींना विशिष्ट वातावरणात वेगवेगळ्या प्रकारचा त्रास जाणवू लागतो. शिंका येणे, डोळे लाल होणे, डोळे खाजणे, नाक वाहने इत्यादी. तेव्हा आपण त्यांना विशिष्ट अशा आहाराची, वातावरणाची अ‍ॅलर्जी आहे, असे समजतो. अ‍ॅलर्जीने ग्रासलेले रुग्ण बरे होण्यासाठी वर्षानुवर्षे वेगवेगळ्या वेगवेगळ्या पॅथींची औषधी घेतात. परंतु रुग्णांना योग्य असा परिपूर्ण फायदा होत नाही.

विशेष म्हणजे एखाद्या पदार्थाची ॲलर्जी आहे हे अनेकांना कळत नाही आणि तो पदार्थ सातत्याने खाण्यात येतो. त्यामुळे ॲलर्जीपासून दूर राहायचं असल्यास अशा काही आवडीच्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. आयुर्वेद दृष्टिकोनातून अ‍ॅलर्जी ही एक अवस्था आहे. त्रिदोषांच्या विकृत अवस्थेला अनुकूल आहार सेवन व वातावरणाचा सहवास रुग्णांनी केला असेल तर अ‍ॅलर्जीची लक्षणे अधीक तीव्र जाणवू लागतात, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.

Health Care
Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी काय करावे ?

  • रात्री जागरण करु नये

  • दिवसा झोपणे टाळावे

  • थंड वातावरणापासून दूर राहावे

  • धूळ, उग्र गंध, सुगंधी द्रव्यांपासून दूर राहावे

  • पंख्यांचा वापर रात्री टाळावा

  • मलमूत्र विसर्जनाच्या वेळा पाळून टाळाटाळ करू नये

या आहारापासून दूर राहा :

  • दही, आंबवलेले पदार्थ

  • शिळे अन्न

  • हरभरा, उडीद डाळीचा वापर

  • साबूदाणा, पोहे, चहा -कॉफी

  • मांसाहार, बेकरी पदार्थ फास्ट फूड

  • थंड पदार्थ, पाणी वापर टाळावा

  • मद्यपान, धूम्रपान अवश्य टाळावे.

लक्षणे

  • वारंवार अतिप्रमाणात शिंका येणे

  • डोळ्यांना खाज येणे

  • डोळे लाल होणे

  • डोळ्यात पाणी येणे

  • नाक सतत गळणे-वाहने

  • नाकात गुदगुद ( खाज) करणे

  • कोरडा खोकला येणे.

  • रुग्णांना मलबद्धता

  • ढेकर येणे

  • तळवे गरम होणे

  • तळव्यांना घाम येणे

  • गॅसेस होणे

  • छातीत जळजळ करणे

  • पोट जड पडणे

Health Care
Health Tips : मधुमेहावर करायचीय मात तर हे पदार्थ असायलाच हवेत आहारात, लवकर फरक जाणवेल!

अनियमित आहार सेवनाने तसेच वातावरणातील बदलाने वात-पित्त-कफ या त्रिदोषांचा प्रकोप होतो. त्रिदोषांच्या प्रकोपामुळे नाकाच्या आतील भागात सूज निर्माण होते. अशावेळी पचण्यासाठी हलके अर्थात ज्वारीची भाकर, मूगडाळीचे वरण, भात दोडका, भेंडी, मेथी पालक या अन्नपदार्थांचा वापर करावा. सुका मेवा वापरावा, परंतु पाण्यात न भिजवता. रुग्णांनी योग्य आहार सेवन केला तसेच ॲलर्जी प्रतिबंधक औषधांचा नियमित वापर केला तर अ‍ॅलर्जी पूर्णपणे कायमस्वरुपी बरी होते.

- डॉ. राहुल राऊत, आयुर्वेद तज्ज्ञ, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.