Uric Acid : जर तुम्हाला युरीक अ‍ॅसिडचा त्रास होत असेल तर जाणून घ्या किती प्यावं पाणी

शरीराच्या सर्व व्यवस्था सुरळीत चालाव्या म्हणून पाण्याची फार फावश्यकता असते.
Uric Acid
Uric Acidesakal
Updated on

Water In Uric Acid : हिवाळ्यात बऱ्याच लोकांना युरीक अ‍ॅसिडचा त्रास होतो. कारण हिवाळ्यात पाणी कमी प्यायलं जातं. सोबतच याचं एक मोठ कारण म्हणजे गरम आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा अन्नात वाढलेलंप्रमाण. अशात हे पदार्थ पूर्णपणे बंद करण्याऐवजी वेस्ट प्रॉडक्ट प्युरीन शरीराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय प्रोटीन पचवण्यासाठी मेटाबोलिक रेट वाढवायला हवं. ज्यात पाण्याची मुख्य भूमिका असते. पाण्याच्या कमतरतेने युरीक अ‍ॅसिडचा त्रास कसा होतो जाणून घेऊया.

पाण्याच्या कमतरतेने कसं वाढतं युरीक अ‍ॅसिड?

  • युरीक अ‍ॅसिडच थेट कनेक्शन पाण्याशी आहे.

  • शरीरात पाणी कमी झालं की, युरीक अ‍ॅसिड वेगात वाढायला लागतं.

  • शरीराला डिटॉक्स करणारं एकमेव पदार्थ पाणी आहे.

  • ज्यामुळे प्युरीन मल-मुत्राद्वारे शरीराबाहेर निघून जातं.

  • जेव्हापण शरीरात पाणी कमी होतं तेव्हा ही घाण शरीरात जमा होते. आणि पुढे जाऊन गाऊटची समस्या निर्माण होते.

युरीक अ‍ॅसिड वाढल्यावर जास्त पाणी प्या

  • जर दिवसभरात आवश्यक तेवढं पाणी प्यायलात हळू हळू युरीक अ‍ॅसिड कमी व्हायला लागतं.

  • पाणी युरीक अ‍ॅसिडच्या वाढत्या लेव्हलला थांबवतो.

  • युरीक अ‍ॅसिडला क्रिस्टल रुपात जमा होण्यापासून रोखतात. याला हायपरप्युममियाचा त्रास म्हणतात.

  • याला शरीरा बाहेर काढण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो.

किती पाणी प्यावं?

युरीक अ‍ॅसिडचा त्रास होत असेल तर रोज किमान १०-१२ ग्लास पाणी प्यावं. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. ज्यामुळे टॉक्सिन्स बाहेर पडतील. त्रास हळू हळू कमी होत असल्याचं जाणवेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.