Watermelon Side Effects: उपाशीपोटी कलिंगड खाताय तर सावधान! रिकाम्यापोटी खाणं ठरू शकतं हानिकारक

Watermelon Side Effects: अनेकजण खास करून वजी कमी करण्यासाठी डाएट करणाऱ्या त्यांच्या आहारात कलिंगडाचा समावेश करणं पसंत करतात. खास करून नाश्त्याला प्लेटभर कलिंगड खाल्ल जातं. पण तुम्हाला माहित आहे का? रिकाम्यापोटी कलिंगड खाणं हे शरिरासाठी हानिकारक ठरू शकतं.
रिकाम्यापोटी कलिंगड खाणं ठरेल धोकादायक
रिकाम्यापोटी कलिंगड खाणं ठरेल धोकादायकEsakal
Updated on

Watermelon Side Effects: कलिंगड हे सहजा सगळ्यांना आवडणारं फळ आहे. खास करून उन्हाळ्यात कलिंगड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असत. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगडावर यथेच्छ ताव मारला जातो. गरमीच्या दिवसांमध्ये कलिंगड खाल्ल्याने किंवा कलिंगडचा गारेगार Watermelon juice ज्युस प्यायल्यावर खूपच समाधान मिळतं. watermelon health benefits and side effects Marathi Tips for Summer

अनेकजण खास करून वजी कमी करण्यासाठी डाएट करणाऱ्या त्यांच्या आहारात कलिंगडाचा समावेश करणं पसंत करतात. खास करून नाश्त्याला प्लेटभर कलिंगड खाल्ल जातं. पण तुम्हाला माहित आहे का? रिकाम्यापोटी कलिंगड खाणं हे शरिरासाठी हानिकारक ठरू शकतं. 

कलिंगडात Water Melon अनेक पोषक तत्व आहेत. त्याचे आरोग्यासाठी Health देखील अनेक फायदे आहेत हे खरं असलं तरी ते चुकीच्या वेळी खाणं महागात पडू शकतं Watermelon Health benefits . रात्रीनंतर सकाळी रिकाम्यापोटी कलिंगड खाल्ल्याने काही शारिरीक समस्या निर्माण होवू शकतात. त्यामुळे सावधानगिरी बाळगणं गरजेचं आहे. 

रिकाम्यापोटी कलिंगड खाण्याचे तोटे

  • कलिंगडात मुबलक प्रमाणत पोटॅशियम असतं. यामुळे सकाळी रिकाम्यापोटी कलिंगडाचं सेवन केल्यास छातीमध्य जळजळ होवू शकते. शरिरात अचानक पोटॅशियमचं प्रमाण वाढल्याने हृदयाचे ठोके जलदगतीने वाढतात. ज्यामुळे छातीत दुखण्याची समस्याही उद्भवू शकते.

  • कलिंगडात फायबरचं प्रमाण अधिक असत. सकाळी रिकाम्यापोटी कलिंगड खाल्ल्यास पोटाच्या समस्या जाणवू शकतात. यामुळे पोटंदुखी किंवा पोट फुलणे तसचं उलट्या असाही त्रास होवू शकतो. abdominal discomfort

  • सकाळी रिकाम्यापोटी जास्त प्रमाणात कलिंगडाचं सेवन केल्यास डायरियाचा त्रास होवू शकतो. यामुळे जुलाब आणि पोटात दुखणे याचाही त्रास होतो. तसचं डायरियामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होवून इतर त्रासही उद्भवू शकतात.

  • मधुमेही रुग्णांनी सकाली नाश्त्यामध्ये किंवा रिकाम्यापोटी कलिंगडाचं सेवन आवर्जुन टाळावं. उपाशी असताना कलिंगडाचं सेवन केल्यास शरिरातील ग्लुकोजची पातळी वाढते. मधुमेही रुग्णांसाठी हे धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळेच मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आहारात कलिंगडाचा समावेश करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. तसचं जर एखादी व्यक्ती अनेक दिवस सकाळी रिकाम्यापोटी कलिगंडाचं सेवन करत असेल तर मधुमेह होण्याची शक्यता बळावते.

    हे देखिल वाचा-

रिकाम्यापोटी कलिंगड खाणं ठरेल धोकादायक
Health: कलिंगड खाताना या गोष्टी लक्षात ठेवा!
  •  ज्या महिलांना PCOD ची समस्या आहे. त्या महिलांनी सकाळी रिकाम्यापोटी कलिंगड खाणं टाळावं. यामुळे PCOD ची समस्या अधिक वाढू शकते. यामुळे सिस्टचा आकार आणखी वाढू शकतो आणि भविष्यात ते धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे डाएटमध्ये कलिंगडाचा समानेश करताना कारजी घ्यावी.

  • एखाद्या व्यक्तीला लिवर म्हणजेच यकृताशी संबंधीत जर एखादा आजार असले तर त्याने रिकाम्यापोटी कलिंगड खाणं टाळावं. यामुळे त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते. यासोबतच ब्लड प्रेशर म्हणजेच रक्त दाबासंबधी समस्या असणाऱ्यांनीही सकाळी रिकाम्या पोटी कलिंगड खावू नये. कारण कलिंगड खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढू शकतं.

कलिंगड खाताना याशिवाय काही गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे. watermelon side effects

  • कलिंगड बाजारातून आणल्यानंतर लगेचच कापून खावू नये. तर ते खाण्यापूर्वी काहीवेळ पाण्यात ठेवावं त्यानंतर खावं. तसचं कलिंगड एकदा कापल्यानंतर ते स्टोर करू नये यामुळे त्यातील पोषक तत्व कमी होवू लागला. त्यामुळे कधीही ताज्या कलिंगडाचं सेवन करावं.

  • कलिंगडमध्ये जवळपास ९६ टक्के पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होवू शकतो. तसचं माइक्रोब्स आणि बॅक्टेरिया आपल्या शरीरात पाणी आणि सारखरेच्या मदतीने जलदगतीने पसरतात. त्यामुळे कलिगड खावून पाणी प्यायल्यास बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढतो. तसचं पोटात इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो. 

  • कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे इतर कोणच्याही पदार्थासोबत कलिंगडाचं सेवन करू नये. यामुळे कलिगंडमध्ये असणारी पोषकतत्व शरीराला संपूर्णपणे मिळण्यात अडचणी निर्माण होतात. तसचं कलिंगड पूर्णपणे न पचल्याने अपचन आणि गॅस सारखी समस्या होवू शकते.

  • चुकूनही रात्री जेवल्यानंतर झोपण्यापूर्वी कलिंगड खावू नये. यामुळे अनेक समस्या निर्माण होवू शकतात. रात्री पचनक्रिया मंदावते अशावेळी कलिंगड पचण्यास त्रास होतो. परिणामी दुसऱ्या दिवशी तुम्हाला पोटदुखीचा त्रास होवू शकतो. तसचं किलंगडाती जास्त साखरेच्या प्रमाणामुळे रात्री कलिंगड खाऊन लगेच झोपल्यास वजन वाढू शकतं. त्यामुळे केवळ दिवसा कलिंगडचं सेवनं करणं योग्य. 

यामुळेच कलिंगडचं सेवन करण्याआधी काही गोष्टींची माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कलिंगड खात असताना ते योग्य वेळी आणि प्रमाणात खाल्ल्यास त्याचे तुम्हाला नक्कीच आरोग्यदायी फायदे  मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.