Weight Control Breakfast Tips : हेल्दी जीवनशैली जगण्यासाठी वेळेत नाश्ता करणे फार आवश्यक असते. पण रोज नाश्त्याला काय करावं हा मोठा प्रश्न असतो. रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळाही येतो. मग अशावेळी असा काय नाश्ता करावा जो हेल्दी असेल, टेस्टी असेल आणि शिवाय वजनही नियंत्रणात ठेवून दिवसभर एनर्जी टिकवेल.
एवढे सगळे क्रायटेरीया पुर्ण करणारे ऑप्शन्स शोधून दमण्याची गरज नाही. काही ऑप्शन्स आम्ही घेऊन आलो आहोत. जे तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, सकाळची एनर्जी देऊन दिवसभर उत्साह टिकवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.
बरेच लोक सकाळी उठल्या उठल्या चहा घेतात. पण उपाशी पोटी चहा घेणे आरोग्यासाठी हानीकारक आहे असे तज्ज्ञ सांगतात. अशावेळी चहाला पर्याय म्हणूनही तुम्ही हे पदार्थ घेऊ शकतात.
पीनट बटर
पीनट बटर हे प्रोटीनचा उत्तम सोर्स असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सकाळी पीनट बटर सोबत एक केळं खावे. यामुळे कमी क्वांटीटीत पोट भरते. भरपूर एनर्जी मिळते आणि वजनही कंट्रोल होते. यात चवीनुसार दालचिनी किंवा मधाने गार्निश करू शकतात.
ग्रीन स्मूदी
वेट लॉस करणाऱ्यांसाठी स्मूदी हा प्रकार उपयुक्त ठरत असल्याच अनेक आहार तज्ज्ञांचं मत आहे. यातून आवश्यक पोषण तत्वे योग्य प्रमाणात मिळतात शिवाय पोटही भरते असं मानणं आहे. त्यामुळे पालक, काकडी, केळ, ओवा, सफरचंद, जांभूळ अशा विविध गोष्टी टाकून ही स्मूदी बनवली जाते.
ओट्स
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ओट्सचा ब्रेकफास्ट फार उपयुक्त असतो. त्यामुळे ओट्सपासून बनणारे वेगवेगळे पदार्थ आरोग्यासाठी उत्तमच ठरतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ओट्स दूधात भिजवून त्यात विविध फळांचे काप टाकून खावे. यामुळे पुरेशी एनर्जी मिळते आणि वजन नियंत्रणात राहते.
योगर्ट पारफेट
टेस्टी, हेल्दी आणि न्यूट्रिशीयस योगर्ट पारफेट बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये किंवा बाऊल मध्ये प्लांट बेस्ड योगर्ट घ्या. त्यात ताजे फळ आणि ग्रेनोला घालावे.
फ्रुट इन्फ्युज्ड वॉटर
ताज्या फळांचे काप, पुदिना असे घालून तयार केलेले पाणी आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे फळांमधले पोषण तत्व योग्यरित्या मिळते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.